‘स्वराज्य रक्षक संभाजी’ फेम प्राजक्ता गायकवाड ने दिले ‘गुडन्यूज’

‘स्वराज्य रक्षक संभाजी’ फेम प्राजक्ता गायकवाड ने दिले ‘गुडन्यूज’
सध्या मराठी मालिकांमध्ये अनेक मालिका या प्रचंड गाजत आहेत. यामध्ये आई कुठे काय करते, सुख म्हणजे नक्की काय असतं, सहकुटुंब सहपरिवार यासारख्या स्टार प्रवाह वरील मालिकांचा समावेश आहे, तर झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका देखील प्रेक्षकांना आवडते.
‘स्वराज्य रक्षक संभाजी’ ही मालिका देखील आता प्रेक्षकांना चांगलीच आवडू लागली आहे. या मालिकेतील सगळ्याच भूमिका या जबरदस्त झाल्या आहेत. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमध्ये येसूबाई ची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड लवकरच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी मध्ये दिसणार आहे.
याबाबत आम्ही आपल्याला या लेखात माहिती देणार आहोत. स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका ऐतिहासिक अशी आहे. या आधी देखील अनेक ऐतिहासिक मालिकांना प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली आहे. गेल्या वर्षाच्या सुमारास स्वामिनी ही मालिका देखील स्टार प्रवाह वर सुरू होती. ही मालिका चांगल्या पद्धतीने चालत देखील होती.
मात्र, टीआरपीचा घोळ झाला आणि या मालिकेचा टाइमिंग नंतर बदलण्यात आला. त्यानंतर कालांतराने ही मालिका बंद करण्यात आली. यामध्ये ऐश्वर्या नारकर यांची जबरदस्त अशी भूमिका होती. मालिका चांगली चालत असताना ही मालिका बंद का करण्यात आली याचे उत्तर मात्र मिळू शकले नाही.
आता स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये येसूबाईची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड हीदेखील दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये काम करण्यास तयार झाली आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार हे दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये कार्यरत आहेत. मराठीच्या तुलनेत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये अनेक मराठी कलाकारांना पसंती दिली जाते.
त्याचे कारण म्हणजे मराठी कलाकार आहे हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आणि हिंदी चित्रपटसृष्टी पेक्षा कमी मानधन घेतात. याआधी देखील मोहन जोशी यांच्यापासून सयाजी शिंदे यांच्यापर्यंत अनेक कलाकार दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये दिसले आहेत. प्राजक्ता गायकवाड ही सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
आपल्या चाहत्यांसाठी नवीन व्हिडिओ आणि आपले फोटो देखील शेअर करत असते. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर तिने नुकतेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या चित्रपटाचे नाव चेकमेट असे आहे. संक्रांतली पोस्ट करताना तिने म्हटले आहे की, तीळ घ्या, गूळ घ्या गोड गोड बोला.
मराठी मुलगी मराठी पाऊल पडते पुढे. 2022 मध्ये लवकरच माझा चेकमेट हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ऍक्शन, थ्रिलर, रोमॅंटिक आहे, असे तिने सांगितले आहे. हिंदी, तेलुगू, तामिळ आणि मल्याळम या भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
त्यामुळे प्राजक्ता गायकवाड हिच्या या चित्रपटाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.