या वर्षी पितृपक्षात अमृत सिद्धी योगा सोबत तयार होत आहे ‘हे’ शुभ योग

या वर्षी पितृपक्षात अमृत सिद्धी योगा सोबत तयार होत आहे ‘हे’ शुभ योग

आज सुरू होणारे श्राद्ध पक्ष ६ ऑक्टोंबर पर्यंत चालणार आहे. भाद्रपद महिन्याचा कृष्णपक्ष म्हणजे प्रतिपदा ते अमावास्या हा काळ पितृ पंधरवडा म्हणून ओळखला जातो. मध्य प्रदेश आदी हिंदी भाषी प्रदेशांत पौर्णिमान्त महिने पाळले जातात. तो तेथील आश्विन महिन्यातील पहिला पंधरवडा असतो. पितृपक्ष म्हणजे भारतीयांचे दिवंगत पूर्वज पितर या काळात पितृलोकातून पृथ्वीवर येतात, असा समज आहे. म्हणून त्यांची पूजा त्या दिवसांत केली जाते.

त्या काळात सर्वसामान्यपणे शुभकार्य करत नाहीत; त्याविषयी बोलणी करत नाहीत आणि मोठी खरेदीही करत नाहीत. परंतु या वर्षी सिद्धी योग, रवि योग,अमृत सिद्धी योग असे विशिष्ट योग बनत आहे. या शुभ योगात तुम्ही खरेदी देखील करू शकतात तर पाहूया या शुभ योगासंबंधी सविस्तर माहिती…

अमृत सिद्धी योग- पितृपक्षात २७ आणि ३० सप्टेंबरला अमृत सिद्धी योग बनत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार अमृत सिद्धी योगाला अत्यंत शुभ मानले गेले आहे. हा योग नक्षत्र आणि वाराच्या संयोगात तयार होतो. कार्याला यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी हा योग अत्यंत लाभदायक आहे.

सर्व मंगलमय कार्याच्या शुभ मुहूर्तासाठी हा योग महत्वाचा आहे. या योगात कोणतेही नविन कार्य सुरू करणे शुभ मानले जाते आणि या योगाचे कार्य त्याच्या नावाप्रमाणेच असते. या योगात केल्या जाणाऱ्या पुण्या कार्याचे फळ व्यक्तीला अमृता समान प्राप्त होतात. हा योग यश आणि प्रगती कारक मानले जाते.

रवि योग- पितृपक्षाच्या २६ आणि २७ सप्टेंबर ला रवि योग बनत आहे. रवि योगाला सूर्याचा पूर्ण आशिर्वाद प्राप्त होण्याच्या कारणाने हा प्रभावशाली योग मानला जातो, ज्यात केलेले कार्य शुभ फल देतात. सूर्याच्या पवित्र ऊर्जेने भरपूर असल्याकारणाने या योगात कार्य केल्याने शुभ फल प्राप्ती होते. या योगासंबंधी असे सांगितले जाते की सर्व वाईट दोषांचा विनाश होऊन जातो. पितृपक्षात रवि योगाचं पडणं खूपच कल्याणकारी मानलं जातं.

सर्वार्थ सिद्धी योग- पितृपक्षात २१,२३,२४,२७,३० सप्टेंबर आणि ६ ऑक्टोंबर ला सर्वार्थ सिद्धी योग राहील. सर्वार्थ सिद्धि योग एक अत्यंत शुभ योग आहे. जो निश्र्चित वार आणि नक्षत्राच्या संयोगातून तयार होत आहे. हा योग सर्व इच्छा तथा मनोकामना पूर्ण करणारा मानला जातो. असं म्हणतात की या योगात केले जाणारे सर्व कार्य यशस्वीरीत्या पूर्ण होतात आणि लाभ प्राप्त करून देतात.

या योगात शुक्र अस्त,पंचक,भद्रा इत्यादींवर कुठलाच विचार केला जात नाही. जर मुहूर्त नाही मिळत असणार तर शुभ योगात तुम्ही कार्य करू शकतात. या योगात सर्व दोष दूर करण्याची क्षमता असते.

Team Beauty Of Maharashtra