‘पावनखिंड’ चित्रपटात रायाजीची भूमिका साकारणाऱ्या अंकित मोहनची पत्नी आहे ‘ही’ मराठी अभिनेत्री

पावनखिंड हा चित्रपट 18 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या अनेक चित्रपटात प्रदर्शित झाला. महाराष्ट्रात जवळपास या चित्रपटाला पंधराशे स्क्रीन देण्यात आल्या होत्या. या चित्रपटाने एक नवा विक्रम मराठी चित्रपट सृष्टी मध्ये केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे.
दिग्पाल यांनी यादी फर्जंद, फतेशिकश्त यासारखे चित्रपट बनवले आहेत. आता त्यांच्या पावन खिंड चित्रपटाला देखील प्रचंड यश मिळत आहे. या चित्रपटाने कोट्यवधी रुपयांचा बिझनेस केला असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटात त्यांची भूमिका साकारणारा अभिनेता अंकित मोहन याची पत्नी देखील दिग्गज अभिनेत्री आहे.
या चिञपटात मृणाल कुलकर्णी, प्राजक्ता माळी, चिन्मय मांडलेकर, अंकित मोहन, क्षिती जोग, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी, शिवराज वायचळ यासारख्या कलाकारांच्या ‘पावनखिंड’मध्ये भूमिका आहेत. शूर वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानावर हा चित्रपट साकारला आहे.
शिवचरित्रातील सुवर्णपान असलेल्या पावनखिंडीची गाथा असणारा हा चित्रपट अख्ख्या महाराष्ट्रात लोकप्रिय ठरला आहे. बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका या चित्रपटात अजय पुरकर यांनी साकारली आहे. या चित्रपटातील त्यांची भूमिका ही लोकप्रिय ठरली आहे. पावनखिंड चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजत आहे. मृणाल कुलकर्णी यांनी चित्रपटात अतिशय जबरदस्त असे काम केले आहे.
या चित्रपटात अभिनेता अंकित मोहन याने श्रीमंत रायाजीराव बांदल यांची भूमिका साकारली आहे. इतिहासामध्ये बाजीप्रभू देशपांडे यांच्या , खांद्याला खांदा लावून रायाजी बांदल यांनी देखील पावन खंडित बलिदान दिले होते. अंकित मोहन याने चित्रपटात दर्जेदार भूमिका केली आहे. या चित्रपटात प्राजक्ता माळीने बांदल यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. तिने भवानीबाई ही भूमिका लोकप्रिय केली आहे.
अंकितची खऱ्या आयुष्यातील पत्नीदेखील दिग्गज अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपट आणि मालिका देखील काम केले आहे अंकितच्या पत्नीचे नाव व रुची सुवर्ण असे आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची पत्नी सोयराबाईची भूमिका तिने साकारली. त्यामुळे एकाच चित्रपटात पती आणि पत्नी काम करत आहेत.
रुची आणि अंकितने दिग्पाल लांजेकर यांच्या ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘फर्जंद’ या चित्रपटात देखील भूमिका साकारल्या आहेत. तिने ‘कुमकुम भाग्य’, ‘कुंडली भाग्य’ या मालिकेतही काम केले. तर त्याने महाभारत मालिकेतही ‘अश्वत्थामा’ ची भूमिका अतिशय जबरदस्तरित्या साकारले आहे या दोघांची जोडी अतिशय लोकप्रिय आहे.
2015 मध्ये या दोघांनी लग्न केले आहे. विशेष म्हणजे नुकतेच हे दोघे आई-बाबा झाले आहेत.