राशीनुसार पैशाच्या पाकिटात ठेवा या वस्तू, आर्थिक समस्या होतील दूर

राशीनुसार पैशाच्या पाकिटात ठेवा या वस्तू, आर्थिक समस्या होतील दूर

आपण प्रत्त्येक जण पाकिटात पैशांसोबत, कार्ड आणि इतर आवश्यक वस्तू ठेवतो. पर्सचे अनेक प्रकार आहेत. पुरुषांकडे खिशात ठेवण्याचे पाकिट असते. यामध्ये ठेवल्या जाणाऱ्या वस्तू सकारात्मक आणि नकारात्मक उर्जा निर्माण करतात. राशीनुसार तुम्ही तुमच्या पर्समध्ये काय ठेवणे शुभ असते याबद्दल जाणून घेउया. या उपायांमुळे सकारात्मक उर्जा वाढेल आणि आर्थिक चणचण दूर होईल.

राशीनुसार पाकिटात ठेवा या वस्तू
मेष : लाल रंग किंवा त्याच्याशी संबंधित पर्स तुमच्यासाठी शुभ राहील. गणपतीच्या मंदिरातील बाप्पाला वाहलेल्या दुर्वा पाकिटात ठेवाव्या.

वृषभ : पांढरी किंवा क्रीम रंगाची पर्स तुमच्यासाठी शुभ आहे. त्यात तुम्ही गणपतीच्या मंदिरातल्या अक्षता ठेवाव्या.

मिथुन : तुम्ही हिरवी किंवा राखाडी रंगाची पर्स ठेवू शकता. त्यात चंदनाचा छोटा तुकडा ठेवावा.

कर्क : तुम्ही क्रीम किंवा पांढर्‍या रंगाची पर्स देखील ठेवू शकता जी तुमच्यासाठी शुभ आहे. त्यात हळदीचा एक तुकडा ठेवावा.

सिंह : लाल तपकिरी रंगाची पर्स ठेवल्यास ती शुभ राहील आणि त्यात शनीची अंगठी ठेवा.

कन्या : तुम्ही हिरव्या किंवा तत्सम रंगाची पर्स ठेवू शकता जी तुमच्यासाठी शुभ राहील. त्यात निळ्या रंगाचा रुमाल ठेवा.

तूळ : पांढरी किंवा क्रीम रंगाची पर्स तुमच्यासाठी शुभ मानली जाऊ शकते. त्यामध्ये सोने, पितळ इत्यादी पिवळ्या रंगाच्या शुभ वस्तू ठेवू शकता.

वृश्चिक: तुम्ही फिकट लाल, तपकिरी किंवा राखाडी रंगाची पर्स ठेवू शकता. या पर्समध्ये तांब्याची कोणतीही वस्तू ठेवा.

धनु : पिवळ्या किंवा लाल रंगाची पर्स ठेवू शकता. या पर्समध्ये चांदीची वस्तू ठेवा.

धनु : पिवळ्या किंवा लाल रंगाची पर्स ठेवू शकता. या पर्समध्ये चांदीची वस्तू ठेवा.

मकर : काळ्या किंवा राखाडी रंगाची पर्स तुमच्यासाठी शुभ राहील. तुम्ही त्यात एखादी सुगंधी वस्तू ठेवा.

कुंभ : काळ्या किंवा तपकिरी रंगाची पर्स असणे तुमच्यासाठी शुभ राहील, ज्यामध्ये तुम्ही सोने, पितळ इत्यादी पिवळ्या रंगाच्या शुभ वस्तू ठेवू शकता

मीन : पिवळ्या किंवा क्रीम रंगाची पर्स ठेवू शकता. त्यात चंदन ठेवा.

Team BM