करियरची भिती आणि करियरमुळे निराश आहात तर या ५ उपायांचा होईल खास लाभ

करियरची भिती आणि करियरमुळे निराश आहात तर या ५ उपायांचा होईल खास लाभ

समाधानी आणि सुख समृद्धी प्राप्त करण्यासाठी योग्य करियरची आवश्यकता असते. योग्य करियर असेल तर आपण आपल्या सर्व इच्छा, आकांशा पूर्ण करू शकतो. परंतु बऱ्याच वेळा कितीही मेहनत घेतली किंवा तयारी केली तरी करियर मध्ये हवं तसं यश मिळत नाही, कधी कधी पदरी फक्त अपयश येतं आणि त्यामुळे निराशा नकारात्मकता आपल्या मस्तकी भिनते. सध्या करोना मुळे तर सर्व काही अंधूक झाल्यासारखं वाटत असेल, तुम्ही देखील नकारात्मक परिस्थितून जात असाल तर आता काळजी करण्याची गरज नाही ज्योतिषीय उपायांचा होईल फायदा. तर पुढील ज्योतिषी उपाय करून पाहा…

या मंत्रांचा करा जप- नोकरी टिकून राहण्यासाठी आणि नोकरीच्या शोधात असाल तर त्यात यश प्राप्त होण्याकरीता गायत्री मंत्र आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करा आणि हा जप कमीत कमी ३१ वेळा करा. या मंत्रांचा जप रोज केला पाहिजे.

कावळा संबंधी उपाय- कावळा आणि तांदळाचा हा अत्यंत सोपा उपाय आहे. शिजवलेला तांदूळ कावळ्याला खाऊ घाला. या उपायाने शनि देवाचे वाईट प्रभाव दूर होतील. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव कर्मदाता मानले जातात त्यामुळे त्यांचा करियर आणि नोकरीशी संबंध येतो. तसेच कावळ्याचा शनिदेवाशी संबंध जोडला जातो, म्हणून कावळ्या संबंधी हा उपाय केल्यास अतिशय लाभदायक ठरू शकतो.

ऊॅं सूर्याय नम:- रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर सूर्य देवाला जल अर्पण करावे. तांब्याच्या पात्रात थोडा गूड आणि लाल चंदन मिसळा. त्यानंतर ऊॅं सूर्य देवाय नम: चा जप करत अर्घ्य द्या. हा उपाय सोपा आणि तुमच्या करियर व नोकरीसाठी लाभदायक ठरेल.

सकाळी उठल्यावर करा हे काम- असं म्हणतात सकाळी उठल्या बरोबर तळहाताचं दर्शन घेतलं पाहिजे. ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी रोज हे कार्य केले तर धन प्राप्त होण्यास यश मिळते. अशी मान्यता आहे की आपल्या तळहातांमध्ये सरस्वती देवी आणि लक्ष्मी देवीचा वास असतो. रोज सकाळी हा उपाय केल्यास आर्थिक वृद्धी सोबत बौद्धीक क्षमतेत देखील वाढ होते.

गणरायाची आराधना- गणपती बाप्पांना सर्व गुण संपन्न आणि बुद्धीदाता मानलं जातं. प्रत्येक मंगल कार्या आधी बाप्पाची पूजा केली जाते. रोज गणेश बीज मंत्राचा जप केल्यास तुम्हाला ऐच्छीक फळ प्राप्त होईल. गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हटले जाते त्यामुळे जर नोकरी संबंधी नेहमी निराशा पदरी पडत असेल तर बीज मंत्राचा जप केल्यास यशस्वी व्हाल आणि लाभ मिळेल.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Beauty Of Maharashtra