नोकरी-व्यावसायात होत नसेल प्रगती तर चैत्र अमावस्येच्या दिवशी करा हे विशेष उपाय

नोकरी-व्यावसायात होत नसेल प्रगती तर चैत्र अमावस्येच्या दिवशी करा हे विशेष उपाय

चैत्र अमावास्येला सनातन धर्मात फार महत्त्व जाते. याला भूतडी किंवा भूमवती अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी गंगा किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने सर्व पापे धुतली जातात अशी मान्यता आहे. या दिवशी दान करण्याला सुद्धा खूप महत्व आहे . असे केल्याने व्यवसायात प्रगती होते आणि नोकरीत चांगल्या संधी उपलब्ध होतात. यावेळी ही चैत्र अमावस्या 21 मार्चला असेल. ज्योतिष शास्त्रात असे म्हटले आहे की या दिवशी 4 उपाय केल्याने जीवनात समृद्धी येते आणि कुटुंबात सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो. ते उपाय काय आहेत ते जाणून घेऊया.

संतती सुख प्राप्त करण्यासाठी
लग्नाला बराच काळ लोटल्यानंतरही ज्यांना संतती सुखाची आस आहे त्यांनी चैत्र अमावस्येला पिंपळाच्या झाडाच्या मुळाला पाणी, काळे तीळ, दूध आणि जव एकत्र करून अर्पण करावे. यानंतर पिंपळाच्या झाडाची 7 वेळा प्रदक्षिणा करावी. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. असे केल्याने संतती सुखाची शक्यता निर्माण होते.

मंगळ दोष दूर होतो
जर तुम्ही मंगल दोषाने त्रस्त असाल तर भौमवती अमावस्येला मंगल बीज मंत्र ‘ओम क्रां क्रौंं सह भौमाय नमः’ चा 108 वेळा जप करा. यासोबतच कस्तुरी, गूळ, तूप, लाल मसूर, कुंकू, प्रवाळ, सोने, तांब्याची भांडी आणि लाल कपडे गरजूंना दान करा. असे म्हणतात की हा उपाय केल्याने जीवनात मंगल दोषापासून मुक्ती मिळते.

नोकरी-व्यवसायात प्रगती
खूप प्रयत्न करूनही नोकरी-व्यवसायात योग्य प्रगती होत नसलेल्या अशा लोकांना चैत्र अमावस्येला उपाय करता येतील. यासाठी चैत्र अमावस्येच्या दिवशी हनुमानजींना नवीन लाल रंगाचे वस्त्र अर्पण करून रामरक्षा पठण करावे. या दिवशी तांदूळ, दूध आणि कपडे दान करणे खूप शुभ मानले जाते. असे म्हणतात की या उपायाने पितरांची नाराजी दूर होते आणि सर्व अडकलेली कामे पूर्ण होतात.

पितृदोषापासून मुक्ती
ज्या लोकांना पितृदोष आहे त्यांनी चैत्र अमावस्येच्या दिवशी पितरांची पूजा करून त्यांना प्रसन्न करावे. या दिवशी काळे तीळ दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि पितृदोष दूर होतो असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे. हा उपाय केल्याने कुटुंबात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि आर्थिक बळ येते.

Team BM