निर्जला एकादशीला ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी, ठरेल फायदेशीर

निर्जला एकादशीला ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी, ठरेल फायदेशीर

हिंदू धर्मात काही व्रत असे आहेत ज्यांना विशेष महत्त्व आहे. यांपैकी एक म्हणजे ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी. यावेळी १० जून रोजी निर्जला एकादशी साजरी केली जाणार आहे. या व्रताचे विशेष महत्त्व आहे, या दिवशी सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी निर्जला व्रत ठेवून भगवान विष्णूंची पूजा केली जाते. त्यामुळे या दिवशी काय करावे आणि काय करू नये हे आपल्याला चांगलेच माहित असले पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया निर्जला एकादशीला कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी.

निर्जला एकादशी व्रतामध्ये ‘या’ गोष्टींची विशेष काळजी घ्या-
निर्जला एकादशीला ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान वगैरे करून सूर्यदेवाल जल अर्पण करून व्रत ठेवा. यानंतर पिवळे कपडे घाला. या दिवशी, रसाळ फळे आणि पाण्याचे सेवन करू नका. तसेच उपवासाच्या दिवशी तहानलेल्यांना पाणी दिल्यास भरपूर पुण्य प्राप्त होते.

या दिवशी आपल्या घराच्या छतावर किंवा कुठेतरी उघड्यावर प्राणी आणि पक्ष्यांसाठी पाणी आणि धान्य ठेवावे. निर्जला एकादशीच्या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे. एवढेच नाही तर शारीरिक संबंध देखील टाळावेत. निर्जला एकादशीच्या दिवशी गोरगरिबांना अन्नदान करा, भुकेल्यांना अन्नदान करा आणि झाडाखाली पशु-पक्ष्यांसाठी पाणी आणि धान्य ठेवा. हे अनंत परिणाम देईल.

निर्जला एकादशीच्या दिवशी कोणाबद्दलही द्वेष आणि राग मनात ठेवू नका. तसेच द्वेश, लोभ यांसारख्या वाईट सवयी मनात आणू नका.जर तुम्हाला आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर निर्जला एकादशीचे व्रत करू नका, कारण ते अतिशय कठीण व्रत आहे. अशा परिस्थितीत तुमची प्रकृतीही बिघडू शकते.

तसेच दशमीच्या दिवसापासून एकादशीच्या उपवासात तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. दशमीला तामसिक, मांसाहार यांसारख्या पदार्थांचे सेवन करू नये. याशिवाय दारू आणि इतर मादक पदार्थांचे सेवन टाळावे. जर तुम्ही निर्जला एकादशीचे व्रत करत नसाल तरी या दिवशी भाताचे सेवन करू नका. याशिवाय वांगी, शलगम वगैरेही या दिवशी खाऊ नयेत.

Team Beauty Of Maharashtra