‘माझी तुझी रेशीमगाठ’ मधल्या नेहा सोबत सेटवर घडली मोठी घटना, दररोजच्या ‘ह्या’ कृत्याला कंटाळली…

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मधल्या नेहा सोबत सेटवर घडली मोठी घटना, दररोजच्या ‘ह्या’ कृत्याला कंटाळली…

झी मराठीवर गेल्या सहा महिन्यापासून ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका सुरू आहे. ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेमध्ये अनेक वर्षानंतर अभिनेता श्रेयस तळपदे हा दिसला आहे. श्रेयस तळपदे याने त्याच्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरूनच केली होती.

साधारणत: दहा ते पंधरा वर्षांपूर्वी ‘आभाळमाया ‘ नावाची एक मालिका आली होती. या मालिकेचे दिग्दर्शन दिवंगत अभिनेते दिग्दर्शक विनय आपटे यांनी केले होते, तर या मालिकेत सह दिग्दर्शन म्हणून मंदार देवस्थळी लाभले होते, तर आता माझी तुझी रेशीमगाठ मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे.

या मालिकेमध्ये आपल्याला प्रार्थना बेहेरे ही दिसली आहे. प्रार्थना बेहेरे ही देखील अनेक वर्षानंतर मालिकेत आपल्याला पाहायला मिळत आहे. लग्नानंतर तिने चित्रपट मालिकांना काहीसा ब्रेक दिला होता. मात्र, आता ती परत एकदा या मालिकेत दिसत आहे. मध्यंतरी या मालिकेमध्ये एक बदल करण्यात आला होता.

तो बदल म्हणजे या मालिकेत आजोबाची भूमिका साकारणारे अभिनेते मोहन जोशी यांनी ही मालिका सोडली होती. आता त्यांच्या जागी प्रदीप वेलणकर ही भूमिका साकारत आहेत. हा बदल नेमका कशासाठी झाला याबाबत मात्र माहिती कळू शकली नाही. मात्र, मानधनाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत होते.

तर या मालिकेमध्ये आपल्याला संकर्षण कराडे हा देखील दिसत आहे. संकर्षण याने या मालिकेमध्ये समीर याची भूमिका साकारली आहे. तर या मालिकेमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेणारे पात्र म्हणजे बालकलाकार मायरा वायकुळ आहे. मायरा हिने या मालिकेमध्ये परी ही भूमिका साकारली आहे.

परी म्हणजेच मायरा ही सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. अनेक व्हिडिओ देखील शेअर करत असते. तर आता मालिकेमध्ये नेहा आणि यश या दोघांचेही लग्न झाले आहे. लग्नानंतर या दोघांचा संसार देखील फुलला आहे.

आता नेहा म्हणजेच अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने एक तिचा वैयक्तिक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती अतिशय हिरमुसून बसलेली दिसत आहे. याचे कारण म्हणजे लग्न झाल्यानंतर तिला रोज रोज साड्या नेसाव्या लागत आहेत. याबाबत प्रार्थना म्हणाली की, मालिकेत लग्न झाल्यानंतर आता मला रोजच्या रोज साड्या घालावे लागत आहेत.

किती वैताग आहे, रोज साडी घालायची आणि नंतर ऑफिसला पण जायचं आणि ते मला सुट्टी पण देत नाहीत. त्यामुळे मला खूप कंटाळा आला. ही स्नेहा मला रोज साड्या देते, असे म्हणत तिने एका तरुणीला देखील दाखवले, तर नेहा हिच्या या वैतागले पणाला आपण काय म्हणाल? याबाबत आम्हाला कमेंट करून सांगू शकता.

Team Beauty Of Maharashtra