नवरा बायकोमध्ये सतत होतात भांडणे ? करा हे ५ अचूक उपाय

पती पत्नीमध्ये थोडीफार भांडणे होतच असतात पण कधी कधी ही भांडणे इतकी विकोपाला जातात की घटस्फो टापर्यंत परिस्थिती निर्माण होते. अशावेळी पती पत्नी मधील भांडणे कमी करण्यासाठी आणि दोघांमधील प्रेम वाढविण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले गेले आहेत. हे उपाय प्रत्येक प्रकारची भांडणे मिटवण्यासाठी उपयुक्त आहेत आणि पती पत्नीतील प्रेमभाव वृद्धिंगत करतात. तर जाणून घेऊया हे ज्योतिष उपाय कोणते आहेत.
कोणतेही ज्योतिष उपाय करताना ते पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने केले तरंच त्याचा परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतो. वरच्यावर उपाय केले गेले तर त्याचे इच्छित फळ आपल्याला मिळणार नाही त्यामुळे श्रद्धा असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे दिलेली माहिती संपूर्ण वाचा कारण अर्धवट वाचून केलेले उपाय हे लाभ देण्याऐवजी आपल्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
१) गोमतीचक्र : गोमतीचक्र हे कोणत्याही पूजेच्या दुकानात, मोठमोठ्या मंदिराजवळ, तीर्थक्षेत्री किंवा ऑनलाइन सुद्धा मागवू शकता. असे हे गोमतीचक्र महिलांनी कुंकवाच्या डबीत अवश्य ठेवावे. त्यामुळे पती पत्नी मधील वादविवाद कमी होतील आणि दोघांमधील प्रेम वाढू लागेल.
२) दोघांनी सकाळी लवकर उठून सुर्यदेवतेस अर्ध्य अर्पण करावे. सूर्याला एक तांब्याभर स्वच्छ जल अर्पण करावे. ह्या पाण्यात जर गुळाचा खडा टाकाल तर अतिउत्तमच. तसेच हे अर्ध्य देताना सुर्यनामाचा जप करावा. ज्योतिषशास्त्रात असे सांगितले जाते की सुर्यदेवतेस गूळयुक्त जल अर्पण केल्यास दांपत्य जीवन सुखकर होते. वादविवाद नष्ट होतात व एकमेकांवरील प्रेम वाढते.
३) दर गुरुवारी पिंपळाच्या झाडाखाली एक तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. दिव्यासाठी वापरले गेलेले तूप हे देशी गायीचे असावे. तूप उपलब्ध नसल्यास मोहरीच्या तेलाचा दिवा सुद्धा लावू शकता. इतर तेलाचा दिवा सुद्धा परिणामी आहे. यासोबतच ह्याच दिवशी आपल्या घराजवळच्या चौकात रात्रीच्या वेळी असाच एक दिवा प्रज्वलित करावा. दिव्याजवळ थोडी मिठाई सुद्धा ठेवा किंवा साखर/गूळ सुद्धा चालेल.
४) पती पत्नीच्या वादाचे मूळ कारण हे घरातील नकारात्मक ऊर्जा असू शकते म्हणून दररोज आपल्या घरातील फरशी ही मिठाच्या पाण्याने पुसावी. लादी पुसायच्या पाण्यात खडे मीठ चिमूटभर घालून पाणी व्यवस्थित ढवळून घ्यावे आणि ह्या पाण्याने संपुर्ण घरातील फरशी पुसून घ्यावी. ह्या छोट्याशा उपायाने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. घरात सुख नांदते आणि घरातील वादविवाद कमी होतात.
५) घरात धनसमस्या असतील आणि त्यामुळे पती पत्नीत वाद होत असतील तर त्यासाठी हा उप्पय करून पाहा. दर शुक्रवारी आपण माता लक्ष्मीची पूजा करा व सोबतच भगवान श्रीविष्णूंची सुद्धा पूजा करा आणि त्यांना नैवेद्य म्हणून घरात काहीतरी गोड बनवा. त्यात जर खीर केलीत तर अतिउत्तमच राहील. हा भोग देवाला अर्पण करा आणि नंतर कुटुंबातील सर्व लोकांनी मिळून हा प्रसाद ग्रहण करावा. ह्यामुळे घरातील वादविवाद नष्ट होऊन घरात सुखशांती नांदते.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.