नागपंचमी विशेष- या नागपंचमीला करा हे उपाय, साप घराकडे फिरकणारही नाही

साप किंवा नाग असं म्हटलं की प्रत्येकालाच भिती वाटते, विषारी सापाने चावलं तर मृत्यूलाच शरण जावं लागतं. बऱ्याचदा पावसाळ्यात, ज्यांची घरे खूप जुनी किंवा तुटलेली असतात किंवा जंगलाला लागून असलेली ठिकाणे असतात, तेथे साप निघतात. देशाच्या काही भागात आज म्हणजेच श्रावन महिन्यातील कृष्ण पक्षाची पंचमी नागपंचमी म्हणून साजरी केली जात आहे, तर काही राज्यांमध्ये १३ ऑगस्टला नागपंचमी साजरी केली जाईल.
या निमित्ताने तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत ज्याद्वारे साप तुमच्या घरांपासून दूर राहतील. तर जाणून घ्या साप आपल्या घरापासून दूर राहावे यासाठी खास उपाय…
या मंत्राचा करा जप- सर्पापसर्प भद्रं ते गच्छ सर्प महाविष. जन्मेजयस्य यज्ञान्ते आस्तीक वचनं स्मर। आस्तीकवचनं समृत्वा य: सर्प न निवर्तते. शतधा भिद्यते मूर्धि्न शिंशपावृक्षको यथा.
या मंत्राचा जप केल्याने सापाची भिती दूर होते. ज्या घरांमध्ये लोक नियमितपणे या मंत्राचा जप करतात तेथे साप येत नाहीत. असं म्हणतात की जर घरात साप आला तर या मंत्राचा पाठ केल्याने साप लगेच निघून जातो. नागपंचमीच्या दिवशी नाग पूजनासोबत या मंत्राचा जप करावा. या मंत्राच्या प्रभावाने सर्पदंश होण्याची भितीही दूर होते.
गायीच्या शेणाचा उपाय- हिंदू धर्मात गायीचे शेण अत्यंत शुद्ध आणि पवित्र मानले जाते आणि प्रत्येक पूजा आणि शुभ कार्यात गायीच्या शेणाच्या गौरीचा वापर केला जातो. नागपंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर भिंतीच्या दोन्ही बाजूला शेणाच्या गौरीचा साप बनवा. त्यानंतर या नागांवर थोडे कच्चे दूध अर्पण करा.
तांब्याच्या नाग नागिनीची पूजा- धार्मिक दृष्टिकोनातून तांबे हा अत्यंत शुभ धातू मानला जातो. नागपंचमीच्या दिवशी तांब्याच्या नाग नागिनीची पूजा करणे खूप चांगले मानले जाते. नागपंचमीच्या दिवशी तुम्ही विधिवत तांब्याच्या सापांची आणि नागांची पूजा करावी आणि पूजेनंतर या सापांना तुमच्या संपत्तीच्या जागी ठेवा.
नागपंचमीला या मंत्राचे करा पठण- ओम नवकुलाय विद्यमहे विषदंताय धीमही तन्नो सर्प: प्रचोदयात
“‘सर्वे नागा: प्रियन्ता मे ये केचित पृथ्वीतले, ये च हेलीमरीचिस्था ये न्तरे दिवी संस्थिता, ये नदिषु महानागा ये सरस्वतिगामिन:, ये च वापीतडागेषु तेषु सर्वेशु वै नमः”
नागपंचमीच्या दिवशी सर्पदेवतेचे या मंत्राने ध्यान करावे. जर तुम्हाला या मंत्राचा जप करण्यात अडचण येत असेल तर असे म्हणा – जो नाग पृथ्वीवर, आकाशात, स्वर्गात, सूर्याच्या किरणांमध्ये, तलावांमध्ये, वापीमध्ये, विहिरीत राहणाऱ्या सर्व सापांना नमस्कार करतो. या मंत्राच्या पठणाबरोबरच नागपंचमीच्या दिवशी लिंबू आणि कडुलिंबाची पाने चावून खावीत. नाग पंचमीच्या दिवशी या मंत्रांनी नाग पंचमीची पूजा केल्याने नागलोकातील नाग आणि साप प्रसन्न होतात. या मंत्राचा जप केल्याने भिती दूर होते आणि घरात धनधान्यााची बरकत राहते अशी मान्यता आहे.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.