किरण माने, अजय पुरकर यांच्या पाठोपाठ ‘या’ अभिनेत्रीचा ‘मुलगी झाली हो’ मालिकेतुन काढता पाय, कारण अद्याप अस्पष्ट

मुलगी झाली हो ही मालिका सुरुवातीपासूनच चर्चेत राहिलेली आहे. मध्यंतरी ही मालिका किरण माने यांच्यामुळे चर्चेत आली होती. किरण माने यांनी या मालिकेच्या निर्मात्यावर आरोप करून आपल्याला जबरदस्तीने मालिकेच्या बाहेर काढण्यात आले असे सांगितले होते.
मात्र, त्यानंतर हा वाद प्रचंड पेटला होता. किरण माने यांनी राजकीय पोस्ट करून सोशल मीडियावर ती पोस्ट केली होती. त्यामुळे त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असे सांगण्यात येते. किरण माने यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह जितेंद्र आव्हाड यांची देखील भेट घेतली होती. मात्र त्याचा काही उपयोग झाल्याचे दिसत नाही.
या मालिकेच्या काही अभिनेत्रींनी देखील किरण माने यांच्यावर गंभीर आरोप लावले होते. मुलगी झाली ही मालिका त्यानंतर चर्चा आली. एकामागून एक कलाकारांनी ही मालिका सोडण्यास सुरुवात केली. काही दिवसांपूर्वी ही मालिका बंद होणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर अजय पुरकर यांनी देखील ही मालिका सोडली.
मात्र नंतर मालिकेच्या निर्मात्यांनी या मालिकेचा वेळ आता दुपारी होत असल्याचे सांगितले. त्यामुळे आता ही मालिका लवकरच बंद होणार असे मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर एका अभिनेत्रीने देखील ही मालिका सोडली आहे, असे सांगण्यात येत आहे.
मुलगी झाली हो ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेतील कथा आणि त्यातील कलाकार यामुळे त्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी ही मालिका बंद होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र त्यानंतर चैनलने ही मालिका दुपारी प्रसारित होणार असल्याचे सांगत त्यावर स्पष्टीकरण दिले होते.
या चर्चा बंद होत नाही तोपर्यंत मालिकेतील दोन कलाकारांनी या मालिकेला रामराम केला करत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता अंबिकर हिने ही मालिका सोडल्याचे समोर आले आहे. या मालिकेत आर्या ही भूमिका साकारत होती. याबाबतचे वृत्त एका इंस्टाग्राम पेजने दिले असून मुलगी झाली हो या मालिकेतील पात्र साकारणारी अभिनेत्री श्वेता हिने ही मालिका सोडली आहे.
या मागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या मालिकेच्या सुरुवातीपासूनच तिचे आर्या हे पात्र लोकप्रिय ठरले होते. मात्र अवघ्या एका आठवड्यात दोन कलाकारांना मालिका सोडल्यामुळे आता मालिकेची चर्चा होत आहे.