‘मुळशी पॅटर्न’ नंतर चित्रपटातील हा कलाकार दिसणार एका ऐतिहासिक चित्रपटात…

‘मुळशी पॅटर्न’ नंतर चित्रपटातील हा कलाकार दिसणार एका ऐतिहासिक चित्रपटात…

मुळशी पॅटर्न हा चित्रपट आपल्याला आठवत असेल. 2018 मध्ये हा चित्रपट आला होता. या चित्रपटांमध्ये प्रवीण तरडे यांची अप्रतिम अशी भूमिका होती, तर या चित्रपटामध्ये महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये या सारखे दिग्गज कलाकार देखील दिसले होते.

मात्र, या सगळ्यांमध्ये भाव खाऊन गेला होता तो राहुल्या. राहुल्या म्हणजे अभिनेता ओम भुतकर. ओम भुतकर याने या चित्रपटात काम केलेले आहे. मात्र, मुळशी पॅटर्न चित्रपटातील त्याने काम केलेली भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. मुळशी पॅटर्न हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत असल्याचे सांगण्यात येते.

पुण्याजवळील मुळशी येथे जमिनीचे भाव हे आता गगनाला भिडलेले आहेत. या जमिनीच्या राजकारणावर आणि गुन्हेगारी जगतावर हा चित्रपट आधारीत होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. त्यानंतर प्रवीण तरडे यांनी काही चित्रपटाची निर्मिती देखील केली.

देऊळबंद या चित्रपटात ते स्वतः काम करताना दिसले. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. काही महिन्यांपूर्वी प्रवीण तरडे पुन्हा एकदम चर्चेत आले होते. त्यांचा वादग्रस्त फोटो शेअर झाला होता. त्यानंतर यांना जाहीर माफी देखील मागावी लागली होती. या चित्रपटांमध्ये राहुल्या हे पात्र प्रेक्षकांच्या लक्षात राहण्याचे कारण म्हणजे या चित्रपटातून त्याच्या तोंडातून निघालेला तो डायलॉग.

हा डायलॉग म्हणजे, “जमीन विकायची नसती राखायची असते” या डायलॉगला प्रेक्षकांनी अक्षरशः उचलून धरले होते. त्यानंतरही त्याने फास्टर फेणे, देऊळ, नाळ यासारख्या चित्रपटातही काम केले. मात्र, मुळशी पॅटर्न मधील त्याची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. तसेच तो सादर करीत असलेला सुखन हा कार्यक्रम देखील अनेकांना खूप आवडतो.

सुफी आणि मराठीचा मिलाफ यात दाखवण्यात आलेला आहे. हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून तो करत आहे. आता ओम भूतकर हा लवकरच एका ऐतिहासिक चित्रपटात दिसणार असल्याचे सांगण्यात येते. याबाबत नुकताच एक व्हिडिओ शेअर झाला आहे. या चित्रपटाचे नाव रावरंभा असे असणार आहे.

या चित्रपटामध्ये राव ही भूमिका अभिनेता ओम भुतकर साकारणार आहे. रंभाच्या भूमिकेमध्ये मोनालीसा बागल ही दिसणार आहे. तसेच या चित्रपटामध्ये गिरीश कुलकर्णी यांची भूमिका असल्याचे सांगण्यात येते. सह्याद्रीच्या कडेकपारीत वसलेली एक प्रेम कहाणी या चित्रपटाच्या माध्यमातून ऐतिहासिक रूपात दाखवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता अनेकांना आता लागलेली आहेत.

Team Beauty Of Maharashtra