Bigg Boss Marathi 3- “प्रत्येक मुलगी बोलायला समर्थ आहे”, मीराने या स्पर्धकाला सुनावले खडेबोल

Bigg Boss Marathi 3- “प्रत्येक मुलगी बोलायला समर्थ आहे”, मीराने या स्पर्धकाला सुनावले खडेबोल

बिग बॉसमराठी सिझन ३ मधील प्रत्येक दिवस स्पर्धकांसाठी कठीण होत चालला आहे. त्यात बिग बॉसच्या घरात काही मिळवायचं असेल तर स्पर्धकांना बराच घाम गाळावा लागतो. बिग बॉसच्या घरात दर आठवड्यात येणाऱ्या ट्विस्टची घरातील सदस्यांना कल्पनासुद्धा नसते.बिग बॉस मराठीच्या घराच्या स्पर्धकांना टास्क पूर्ण करताना अक्षरक्षः संयमची कसोटी लागते.

बिग बॉसच्या घरातील स्पर्धक सदस्यांचा अंदाज, त्यांच्यातील वाद-विवाद, कधी कधी डोळ्यात तरळणारे अश्रू आणि तितकंच प्रेम यामुळे बिग बॉस मराठी रसिकांना भावतो आहे. आपल्या लाडक्या कलाकारांना बिग बॉसच्या घरात पाहणं रसिकांना भावतंय. दर आठवड्याला विविध टास्क, नॉमिनेशन्स आणि त्यातून निर्माण होणारे तंटे रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.

बिग बॉसच्या घरातील आगामी आठवडा वेगळा ठरणार आहे. घरातील सदस्यांसाठी अधिक उत्साहवर्धक, नवे धडे देणारा ठरेल. बिग बॉसच्या काही स्पर्धकांची घरातून इमोशन एक्झिटनंतर घरातील वातावरण काहीसं बदल्याचे पाहायला मिळत आहे.घरामध्ये सध्या सुरू असलेल्या टास्कमध्ये विशाल आणि मीरामध्ये वादाची ठिणगी पडली. टास्क दरम्यान मीनल मीराला असं काही बोलून गेली की तिथपासून या भांडणाला सुरुवात झाली. विशालचे त्यावर म्हणणे होते अगदी बरोबर बोलली मीनल. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये विशाल आणि मीरा एकमेकांशी भांडताना दिसत आहेत.

मीनल म्हणता म्हणता म्हणून गेली, लई फेमस आहे किडे करायला तिचं नावं आहे मीराबाई. मीरा त्यावर म्हणाली खोटी गोष्ट सांगेन मी नंतर. त्यावर मीनल म्हणाली, तू काय म्हणालीस भोपळ्याचं मी बोलू का ? विशाल म्हणाला पेरफेक्ट बोलली आहे …मीराला राग अनावर झाला ती म्हणाली, तू कशाला मध्ये पडतोस सगळ्यांच्या ? प्रत्येक मुलगी बोलायला समर्थ आहे. आता या दोघांचा वाद संपेल की टोकाला जाणार हे आगामी भागात स्पष्ट होईल.

Team Beauty Of Maharashtra