‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम अभिनेत्री ‘प्रार्थना बेहेरे’ने दिली ‘खुशखबर’, घरी झाले चिमुकल्या पाहुण्याचे आगमन…

‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम अभिनेत्री ‘प्रार्थना बेहेरे’ने दिली ‘खुशखबर’, घरी झाले चिमुकल्या पाहुण्याचे आगमन…

झी मराठीवर सुरू असलेल्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी नेहमीच संपर्कात असते. या मालिकेमध्ये तिने नेहाची भूमिका अतिशय उत्कृष्टपणे साकारली आहे.

तर या मालिकेमध्ये आपल्याला श्रेयस तळपदे हा देखील अनेक वर्षानंतर दिसत आहे. या मालिकेमध्ये त्याने यश ची भूमिका साकारली आहे, तर या मालिकेमध्ये संकर्षण कराडे हा देखील दिसत आहे. त्याची देखील भूमिका प्रेक्षकांना खूप आवडत आहे. मालिकेमध्ये परीची भूमिका देखील खूप लोकप्रिय ठरली आहे.

ती देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आता अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. मालिकेमध्ये तिचे यश सोबत लग्न झालेले आहे. तसेच तिचे वैयक्तिक आयुष्यातही लग्न झालेले आहे. मात्र, तिने आता गुड न्यूज दिली आहे की काय अशा चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत. आम्ही याबद्दल आपल्याला माहिती देणार आहोत.

प्रार्थना बेहेरे हिने बॉलिवूडमध्ये देखील काम केले आहे. तसेच तिने मराठी मालिका व चित्रपट देखील खूप काम केले आहे. तिने पवित्र रिश्ता या मालिकेत काम केले आहे. ही मालिका त्यावेळी प्रचंड गाजली होती. त्याचप्रमाणे जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा या चित्रपटाला राज्यामध्ये प्रचंड यश मिळाले होते.

प्रार्थना बेहेरे हिला काही पुरस्कार देखील या चित्रपटासाठी मिळाले होते. प्रार्थना ही सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तसेच आपले फोटो देखील ती या माध्यमातून शेअर करत असते. आपले विचार देखील ती मांडत असते. काही महिन्यांपूर्वी तिने आपला लहानपणीचा फोटो शेअर केला आहे.

मात्र, हा फोटो अनेकांना ओळखता आला नाही. प्रार्थना बेहेरे हिने अभिषेक जावकर याच्या सोबत लग्न केले आहे. अभिषेक हा देखील चित्रपट सृष्टीशी संबंधितच आहे. तो दक्षिणेमध्ये चित्रपटाचा डिस्ट्रीब्यूटर आहे. अभिषेक याने डब्बा या चित्रपटाची निर्मिती केली होती. या दोघांची जोडी अतिशय परफेक्ट असून त्यांची केमिस्ट्री देखील खूप जुळत असल्याचे सांगण्यात येते.

आता प्रार्थना बाहेरच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे, अशा पोस्ट सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून फिरत आहेत, तर प्रार्थना बेहेरे हिच्या घरी चिमुकला पाहुणा आलेला एक कुत्रा आहे. या कुत्र्याचा तिने फोटो शेअर केला आहे. आपल्या मांडीवर तिने कुत्र्याला घेतलेले आहे आणि त्याच्याशी ती खेळताना देखील दिसत आहे.

प्रार्थना बेहेरे हिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत, तर अनेकांनी यात एवढं काय असे म्हणून तिच्यावर टीका देखील केली आहे.

Team Beauty Of Maharashtra