‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेमधील कलाकारांना मिळते एवढे मानधन, परी एका एपिसोडसाठी घेते चक्क एवढे मानधन

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेमधील कलाकारांना मिळते एवढे मानधन, परी एका एपिसोडसाठी घेते चक्क एवढे मानधन

नुकतीच सुरू झालेली मराठी सीरिअल माझी तुझी रेशीमगाठमध्ये (Majhi tujhi reshimgath) सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं ते एका गोड चिमुकलीने. या सीरिअलच्या प्रोमोत ही चिमुकली अभिनेता श्रेयस तळपदेसमोर बसून त्याला काय काम करतो, किती कमावतो असे प्रश्न विचारते. तिच्या या गोड, निरागस प्रश्नांनी सर्वांचंच मन जिंकलं. आता चिमुकलीची कमाई तुम्हाला माहिती आहे का?

झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठमधील ही चिमुकली म्हणजे परी. जिचं खरं नाव मायरा वैकुल आहे. जी फक्त पाच वर्षांची आहे. या मालिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहरे म्हणजे मालिकेतील नेहा कामत आहे आणि अभिनेता श्रेयस तळपदे म्हणजे मालिकेतील यश चौधरी या दोघांसोबत ही चिमुकली मायरा म्हणजे परीसुद्धा भाव खाऊन जाते. मालिकेतील बड्या कलाकारांना ती चांगलीच टक्कर देत आहे.

फक्त अभिनयच नव्हे तर ही एवढीशी चिमुकली या इतर कलाकारांच्या तुलनेत या मालिकेसाठी चांगलंच मानधन घेते आहे. मराठी सितारा या युट्यूब चॅनेलवर या मालिकेतील मुख्य कलाकारांच्या मानधनाबाबत माहिती देण्यात आली आहे. हे कलाकार एका एपिसोडसाठी अंदाजे किती मानधन घेतात हे सांगण्यात आलं आहे.

या मालिकेच्या एका एपिसोडसाठी प्रार्थना बेहरे 32,000 रुपये, श्रेयस तळपदे 38,000 रुपये, संकर्षण कऱ्हाडे, 28,000 रुपये घेतो. तर अवघ्या पाच वर्षांची चिमुकली मायरा तब्बल 10,000 हजार रुपये घेते. इतर कलाकारांपेक्षा तिचं मानधन कमी असलं तरी तिचं वय आणि तिच्यासमोर असलेल्या कलाकारांच्या मानधनाच्या मानाने तिचं हे मानधन खूप आहे.

Team Beauty Of Maharashtra