‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेच्या प्रेक्षकांसाठी वाईट बातमी, या कलाकाराने घेतला ब्रेक

झी मराठीवर माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका प्रेक्षकांचे बरेच मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेमध्ये प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदे यांची प्रेम कहानी दाखवण्यात आली आहे.
श्रेयस तळपदे याने या मालिकेमध्ये त्याची भूमिका अतिशय जबरदस्तरित्या साकारली आहे. तो अतिशय डॅशिंग दिसत आहे, तर प्रार्थना बेहेरे हिने नेहा ची भूमिका या मालिकेत चांगल्या पद्धतीने केली आहे, तर समीरच्या भूमिकेमुळे आपल्याला संकर्षण कराडे दिसत आहे, तर आजोबाच्या भूमिकेमध्ये मोहन जोशी यांनी देखील जीव ओतला आहे.
तर या मालिकेमध्ये एक छोटी मुलगी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ती मुलगी म्हणजे छोटी परी होय. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमध्ये परी या भूमिकेने सगळ्यांनाच वेड लावले आहे. परी ही भूमिका मायरा वायकूळ हिने साकारत आहे. मायरा हिने आता या मालिकेतून ब्रेक घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.
त्यामुळे प्रेक्षकांना मायरा वायकूळ काही दिवस दिसली नाही तर आश्चर्य वाटायला नको. ती काही दिवस सुट्टीवर गेली असल्याचे सांगण्यात येत आहे, तर माझी तुम्ही रेशीमगाठ या मालिकेमध्ये नेहा आता यशाला आपल्या प्रेमाची कबुली देणार असल्याचे सध्या तरी चित्र आहे. कारण समीर आणि यश याने एक प्लान देऊन नेहा हिला बोलते करण्याचा प्रयत्न केला आहे.
हा प्लान म्हणजे यशाची परदेशातून आलेली मैत्रीण होय. हा प्लान दोघेही रचतात आणि त्यामुळे स्नेहा हिला असुरक्षित वाटायला लागते आणि तिचे खरेच यस वर प्रेम आहे ते आता लवकरच यशला सांगणार असल्याचे कळते. तर मालिकेमध्ये छोटी मायरा वायकुळ म्हणजेच परी हिचे देखील यशासोबत चांगले जमत आहे.
यश आणि तिची बाँडिंग खूप चांगल्या प्रकारे जमलेली आहे. श्रेयस तळपदे याने काही वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. आभाळमाया त्याची ही मालिका लोकप्रिय ठरली होती. आभाळमाया या मालिकेमध्ये सुकन्या कुलकर्णी, संजय मोने मनोज जोशी यांनी काम केले होते. ही मालिका मंदार देवस्थळी यांच्यासोबत विनय आपटे यांनी केली होती.
त्यानंतर श्रेयस तळपदे याने मागे वळून पाहिले नाही. श्रेयस तळपदे यांनी अनेक मालिका आणि चित्रपटातही काम केले. त्यांनी काम केलेले सगळ्याच मालिका आणि चित्रपट लोकप्रिय ठरल्या आहेत. आता या मालिकेतील मायरा वायकुळ म्हणजेच परी हिने ब्रेक घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.
याचे कारण म्हणजे मायराच्या मामाचे लग्न आहे आणि ती नुकतीच कोकण ट्रिप ला देखील जाऊन आलेली आहे. त्यामुळे ती सध्या सुट्टीवर असल्याचे सांगण्यात येते. मायरा सध्या आता तिच्या आजोळी आल्याचे सांगण्यात येते. मामाच्या लग्नाची लगबग सुरू असल्याचे दिसते. मायरा हिची आई श्वेता थोरात वायकुळ या मूळच्या नाशिकच्या आहेत आणि मायराच्या मामाचे आता लग्न आहे.
त्यामुळे ती लग्न एन्जॉय करत आहे. मायरा हिने सोशल मीडियावर आणि तिच्या यूट्यूब चैनल वर नुकतेच काही फोटो आणि व्हिडिओ अपलोड केले आहे. या फोटोमध्ये ती आपल्या मामासोबत एन्जॉय करताना दिसत आहे. मामाच्या अंगाला हळद लागलेली दिसत आहेत, तर मायरा काही दिवसांनी पुन्हा मालिकेत पुन्हा परतणार आहे.