‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीची झाली मोठी फसवणूक, बँक खात्यावर…

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीची झाली मोठी फसवणूक, बँक खात्यावर…

धनश्री गेल्या आठ वर्षांपासून अभिनय क्षेत्रात काम करत आहे. तिने आत्तापर्यंत अनेक मराठी मालिका आणि जाहिरातींमध्ये देखील काम केले आहे. आता ती सध्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत काम करत आहे.

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत सध्या आजोबांची तब्येत बिघडलेली असते. त्यांची तब्येत सुधारावी यासाठी सीमी काकू यश आणि नेहाचे लग्न झाले आहे, असे खोटे संगातात. नेहा देखील आजोबा लवकरात लवकर बरे व्हावेत म्हणून हो आजोबा आम्ही लग्न केले आहे, असेच सांगते.

याच मालिकेतील एका अभिनेत्रीला संकटास सामोरे जावे लागले आहे. तिच्या संयमाने ती या संकटातून सावरली आहे आणि आपल्या सर्व चाहता वर्ग सजग रहावा यासाठी तिने सोशल मीडियावर एक पोस्ट देखील केली आहे. यात ती म्हणते की, माझ्याकडून बावीस हजार रुपये एका कंपनीने घेतले होते.

वेबसिरीज मध्ये काम देतो, असं सांगून ही रक्कम घेण्यात आली होती. 8 डिसेंबर 2019 रोजी धनश्रीला नामांकित निर्मिती कंपनीच्या नावाने एक ईमेल आला. मेल पाठवणाऱ्या व्यक्तीने आपलं नाव अनिकेत असल्याचे सांगितले. दिग्दर्शक म्हणून काम करत असल्याचे तिला सांगितले.

एका वेब सिरीज मध्ये निवड झाल्याचं त्या मेलमध्ये सांगण्यात आलं होतं. धनश्री हिने काम करण्यास होकार दिला. त्यानंतर अनिकेत याने व्हाट्सअप वर संपर्क साधून पुढील काम देण्यात येईल असे सांगितले. काही दिवसांनी अनिकेतने काम करण्याची तारीख पुढे ढकलण्यात धनश्रीला कळवलं.

तसेच काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी हैदराबाद मधील कार्यालयात जावे लागेल, असे देखील तिला सांगितले. त्यानंतर एक फेब्रुवारी रोजी शिवा नावाच्या एका व्यक्तीने धनश्रीला संपर्क केला. कंपनीचा कार्यकारी निर्माता असल्याचे त्याने सांगितलं. हैदराबाद कंपनीच्या कार्यालयात कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी या असे धनश्रीला सांगण्यात आले.

धनश्री कडून विमानाच्या तिकिटांची नोंद होत नव्हती. म्हणून शिवने तिला एक क्रमांक दिला आणि त्या क्रमांकावर पैसे भरण्यास सांगितले. धनश्रीने विमान तिकिटाचे बावीस हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा केले. मात्र तिला तिकीट मिळाले नाही. घडलेल्या घटनेनंतर धनश्रीने शिवा आणि अनिकेत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

दोघांकडून काहीच उत्तर आले नाही आणि यानंतर धनश्रीला लक्षात आले की आपली फसवणूक झाली आहे. तिने पोलीस तक्रार केली. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील सुनयना म्हणजेच धनश्री भालेकर ने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. वेब सिरीज मध्ये काम देतो असे सांगुन एका कास्टिंग कंपनीने 22 हजार रुपये उकळले होते.

पण आनंदाची बातमी धनश्री ने शेअर केली असून तिचे पैसे परत मिळाल्याचे धनश्री ने सांगितले आहे. धनश्री म्हणाली आहे की याच्या आधी एका व्हिडिओ मध्ये तुम्हाला माझ्याबरोबर झालेला फ्रॉड संबंधी सांगितलं होतं. मला तुम्हाला सगळ्यांना सांगताना खूप आनंद होतोय की, म्हणजे गेलेले सगळे पैसे मला परत मिळाले.

यासाठी स्पेशल पोलीस डिपार्टमेंट त्यांनी खूप छान तपास करून मला माझे पैसे परत मिळवण्यात मला मदत केली. आणि तुम्हा सगळ्यांना पण खूप धन्यवाद आहेm तुम्ही सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला, तर या निमित्ताने मला तुम्हाला सांगायचे आहे की, जर तुमच्या बरोबर फ्रॉड होत असेल तर प्लीज आवाज उठवा, असे तिने सांगितले आहे.

Team Beauty Of Maharashtra