सुखी जीवनासाठी, आरोग्यासाठी मार्गशीर्ष महिन्यात 3 गोष्टी नक्की करा

सुखी जीवनासाठी, आरोग्यासाठी मार्गशीर्ष महिन्यात 3 गोष्टी नक्की करा

हिंदू धर्मानुसार मार्गशीर्ष महिना अतिशय पवित्र मानला जातो. ज्या प्रमाणे श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित आहे त्याच प्रमाणे कार्तिक महिना भगवान विष्णूला समर्पित आहे. या काळात भगवान विष्णूची मनोभावे पूजा केली जाते. या महिन्यात केलेल्या पुजेचे फळ सर्वात लवकर मिळते. एवढच नसून गीतेतसुद्धा श्रीकृष्णाने मार्गशीर्ष महिन्याचे वर्णन केले आहे.

हिंदू धर्मानुसार मार्गशीर्ष महिन्यात दोन प्रमुख विवाह झाले आहेत , एक शिव आणि माता पार्वतीचा विवाह ,तर दुसरा श्री राम विवाह. पूर्वीच्या काळी वर्षाची सुरुवात याच महिन्यापासून होत असे अशी मान्यता आहे. 20 नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरू झाला असून. या महिन्यात विशेष काम केल्याने तुम्हाला भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद मिळू शकतो. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

भगवान श्रीकृष्णाचा प्रिय महिना- स्कंद पुराणातील वैष्णवखंडानुसार मार्गशीर्ष हा भगवान श्रीकृष्णांचा आवडता महिना म्हणून केले आहे.या काळात पहाटे लवकर उठून स्नान करून पूजा केल्याचे अनेक फायदे होतात. या महिन्यात नदीत स्नान करण्याचे विषेश महत्त्व आहे. जर हे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही अंघोळीच्या पाण्यात गंगेचे थेंब देखील टाकू शकता. यामुळे भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात अशी मान्यता आहे.

एक वेळ भोजन करा- महाभारताच्या अनुशासन पर्वच्या एका अध्यायात असे म्हटले आहे की मार्गशीर्ष महिन्यात मनुष्याने एक वेळ भोजन करावे आणि ब्राह्मणाला त्याच्या क्षमतेनुसार भोजन द्यावे. असे करणारा व्यक्ती सर्व रोग आणि पापांपासून मुक्त होतो. जर एखाद्या व्यक्तीने या महिन्यात उपवास केला तर तो निरोगी होते असा उल्लेख देखील पुराणात मिळतो.

अन्नदान करा- कोणत्याही महिन्यात अन्नदान करणे उत्तम मानले जाते, पण या काळात त्याला जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. या महिन्यात अन्नदान केल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

Team Beauty Of Maharashtra