या मराठमोळ्या अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, झाले जवळच्या व्यक्तीचे निधन

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अनेक धक्के बसलेले आहेत. अनेक कलाकार आपल्याला सोडून गेले आहेत. काही दिवसा पूर्वी मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या आवाजाने सगळ्या देशाला मंञमुग्ध करणारे लता मंगेशकर यांचे नुकतेच निधन झाले.
92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. त्यानंतर लता मंगेशकर यांच्या निधनामुळे राष्ट्रीय दुखवटा देखील जाहीर करण्यात आला होता. याआधी रमेश देव यांचे देखील निधन झाले होते, तर नुकतेच वत्सला देशमुख या ज्येष्ठ अभिनेते यांचे देखील निधन झाले आहे. वत्सला देशमुख यांनी पिंजरासह अनेक चित्रपटात काम केले होते.
तर आता मराठी चित्रपटसृष्टी मध्ये काम करणारे दिग्गज अभिनेते अतुल परचुरे यांना देखील पितृशोक झाला आहे, अशी माहिती मिळत आहे. अतुल परचुरे हे नाव मराठी चित्रपटसृष्टी मध्ये तसे जुने आहे. अतुल परचुरे यांनी अनेक मालिका चित्रपटात देखील काम केले आहे. अतुल परचुरे यांनी काम केलेल्या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडतात.
नवरा माझा नवसाचा या चित्रपटात त्यांनी काम केलेली भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्याचप्रमाणे आम्ही सातपुते या चित्रपटात त्यांची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. अतुल परचुरे यांनी अनेक नाटकांमध्ये देखील काम केले आहे. अतुल परचुरे हे अनेक शोचे सूत्रसंचालन देखील करत असतात.
अतुल परचुरे यांच्या प्रमाणे त्याची मुलगी देखील कला क्षेत्राशी निगडीत आहे, असे सांगण्यात येते. अतुल परचुरे यांच्या मुलीचे नाव सखिल असे आहे. तसेच ती मुंबईत एक ब्रँड देखील चालवते. त्याचे मोठे शोरूम देखील आहे, असे देखील बोलले जाते. अतुल परचुरे हे कुटुंबवत्सल व्यक्ती आहेत. त्यामुळे आपल्या ते कुटुंबासोबत राहत होते. अतुल परचुरे यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झालेले आहे.
त्यांच्या वडिलांचे निधन कशामुळे झाले याचे कारण मात्र समोर आले नाही. त्यांनी याबाबत सोशल मीडिया वरून आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे. वडिलांच्या निधनानंतर अतुल परचुरे यांना मराठी चित्रपटसृष्टी मधून अनेकांनी आधार दिला आहे. तसेच त्यांच्या वडिलांना श्रद्धांजली देखील अर्पण केली आहे.