मराठी मालिकांमध्ये झालेला लक्षवेधी बदल तुम्ही ओळखला का?

गेल्या काही वर्षांमध्ये मराठी मालिकांचा ट्रेंड आता बदलताना दिसत आहे. आता मालिका या वेगळ्या पद्धतीने बनवण्यात येत आहेत. काही वर्षापूर्वी दूरदर्शन हे एकमेव चॅनल होते. मात्र, आता मराठी भाषा मध्ये अनेक वाहिन्या सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे कलाकारांना देखील रोजगार मिळाला आहे.
अनेक दिग्दर्शक, निर्मात्यांना देखील आता संधी निर्माण झाली आहे. यामुळे कलाकारांच्या मानधनात ही वाढ झाली आहे आणि त्यांना वेगवेगळ्या मालिका करण्याची संधी मिळत आहे. पूर्वीच्या काळी काही ठरावीक कलाकारास हे मालिका मधील दिसायचे. मात्र, आता वाहिन्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
त्यामुळे नवनवीन कलाकार देखील निर्माण होत आहेत. अजिंक्य राऊत हृता दुर्गुळे यासारख्या नवकलाकारांना आपल्याला मालिका मिळत आहेत. त्यामुळे जुने कलाकार देखील या मालिकांच्या शोधात आहेत. नाटक करणाऱ्या कलाकारांना देखील आता संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे अर्थकारणही वाढले आहे.
काही वर्षांपूर्वी प्रेम प्रकरण हे मालिकांमध्ये दाखवण्यात येत होते. आता देखील ते दाखवण्यात येत आहे. मात्र साधारण चार ते पाच वर्षापासून विवाहित महिलांची प्रकरणे काही मालिकांमध्ये दाखवण्यात येत आहेत. स्टार प्रवाह वर सुरू असलेली आई कुठे काय करते ही मालिका हे त्याचेच द्योतक आहे, असे म्हणावे लागेल.
या मालिकेमध्ये अरुंधती नावाचे मध्यवर्ती पात्र दाखवण्यात आले आहे. अरुंधती आपल्या कुटुंबाप्रती ही प्रामाणिक असते आणि पती प्रति संवेदनशील असते. मात्र, असे असताना पती तिला धोका देऊन प्रेम प्रकरण करतो. त्यानंतर ती हे पण स्वीकारते आणि नंतर घराच्या बाहेर पडून आपले अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करते.
अशा प्रकारच्या कथा आता मालिकांमध्ये दाखवण्यात येत आहेत, तर माझी तुम्ही रेशमगाठ या मालिकेमध्ये एक मुलगी असलेली आई आपल्या भविष्याचा शोध घेताना दाखवण्यात आली आहे. त्यानंतर तिला देखील पुढे मार्ग सापडतो आणि ती पुन्हा लग्न करायच्या तयारीत आहे, तर सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये आता एका कौटुंबिक घराची कहाणी दाखवण्यात आली आहे.
या मालिकेमध्ये वेगळे कथानक दाखवण्यात आले आहे, तर ठिपक्यांची रांगोळी सारखी वेगळी मालिका ही पाहायला मिळत आहे. मन झालं उडू उडू यासारखी प्रेम कहाणी आणि कौटुंबिक मालिकाही आता दिसताहेत. एकूणच काय तर गेल्या काही वर्षात आता मालिका बनवण्याचा ट्रेंड हा बदलला आहे आणि प्रेक्षकांच्या आवडी-निवडी पाहून जाता मालिका बनवण्यात येतात.
मात्र, काही मालिका या कंटाळवाणी होत असल्याने त्या बंद देखील करण्याची मागणी प्रेक्षक मोठ्या प्रमाणात करत असतात.