मराठी सृष्टीतल्या प्रसिद्ध कलाकारांची खरे मुले, एका कलाकाराची मुलगी आहे महाराष्ट्राची ‘क्रश’

मराठी सृष्टीतल्या प्रसिद्ध कलाकारांची खरे मुले, एका कलाकाराची मुलगी आहे महाराष्ट्राची ‘क्रश’

मराठी चित्रपट सृष्टी मध्ये अनेक कलाकार आहेत. या कलाकारांनी भरभरून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या कलाकारांची मुले, कुटुंब नेमके काय करतात, याबद्दल जाणून घेण्याची अनेकांना इच्छा असते. अनेक कलाकारांची मुलं ही कलाक्षेत्रामध्येच कार्यरत आहेत, तर काही कलाकारांच्या मुलांनी मात्र वेगळी वाट निवडली आहे.

आम्ही आपल्याला आज या लेखांमध्ये अशाच काही मराठी कलाकारांच्या मुलाबद्दल माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया, कोण आहे ते कलाकार आणि त्यांचे मुलं काय करतात ते.

आदेश बांदेकर – मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे नाव आदेश बांदेकर यांचे आहे. सध्या ते सिद्धिविनायक गणपती मंदिराचे अध्यक्ष देखील आहेत. ते शिवसेना नेते आहेत. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये त्यांनी आपली वेगळी छाप सोडली आहे. त्यांच्या मुलाचे नाव सोहम बांदेकर असे असून तो देखील अभिनेता आहे.

लक्ष्मीकांत बेर्डे – आपल्या अभिनयाने महाराष्ट्रातील लोकांचे खळखळून मनोरंजन करणारे ज्येष्ठ दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुले देखील चित्रपट सृष्टीमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या मुलाचे नाव अभिनय बेर्डे असे आहे.

आनंद शिंदे – महाराष्ट्राला लोकगीताची मोठी परंपरा लाभली आहे. आनंद शिंदे हे आपल्या जबरदस्त आवाजाने सगळ्यांचेच मनोरंजन करत असतात. आनंद शिंदे यांचे मुले देखील म्मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत. आदर्श शिंदे हा त्यांचा मुलगा देखील वडिलांचे नाव पुढे नेत आहे.

मृणाल कुलकर्णी – मराठी चित्रपट सृष्टीमध्ये मृणाल कुलकर्णी यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांच्याप्रमाणे त्यांचा मुलगा देखील या क्षेत्रात नाव कमवत आहे. त्यांच्या मुलाचे नाव विराजस कुलकर्णी असे आहे.

महेश कोठारे – महेश कोठारे यांनी मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आजवर अनेक चित्रपट दिले आहेत. सध्या ते मालिका निर्मितीमध्ये व्यस्त आहेत. महेश कोठारे यांच्या मुलाचे नाव आदिनाथ कोठारे असे आहे.

अतुल भगरे – अतुल भगरे हे मोठे ज्योतिष्य शास्त्रीय आहेत. मात्र, त्यांची कन्या ही मराठी मालिका विश्वामध्ये आघाडीची अभिनेत्री बनली आहे. तिचे नाव अनघा भगरे असे आहे.

अशोक सराफ – अशोक सराफ यांनी मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अजरामर काम केले आहे. त्यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. अशोक सराफ यांच्या मुलाचे नाव अनिकेत सराफ असून तो चित्रपट क्षेत्रात कार्यरत नाही.

महेश मांजरेकर – महेश मांजरेकर यांनी आजवर हजारो चित्रपट बनवलेले आहेत. महेश मांजरेकर यांच्या मुलीचे नाव सई मांजरेकर आहे. ती देखील मनोरंजन क्षेत्राशी संबंधितच आहे.

विजय चव्हाण – विजय चव्हाण हे मराठी चित्रपट सृष्टीतील एक आजारावर नाव. त्यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. विजय चव्हाण यांचा मुलगा देखील अभिनेता असून त्याचे नाव वरद चव्हाण आहे.

विजय गोखले – विजय गोखले हे मराठीतील आघाडीचे अभिनेते आहेत. विजय गोखले यांच्या मुलाचे नाव आशुतोष गोखले असून सध्या तो रंग माझा वेगळा या मालिकेमध्ये आपल्याला दिसत आहे.

Team Beauty Of Maharashtra