‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला ‘एक रात्र सोबत झोपण्याची’ ऑफर’ मिळाली होती, स्वतः केला खुलासा !

‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला ‘एक रात्र सोबत झोपण्याची’ ऑफर’ मिळाली होती, स्वतः केला खुलासा !

बॉलिवूडमध्ये २०१८ ला मीटू मोहिमेनं डोकंवर काढलं होतं. आता या मोहिमेच्या माध्यमातून मराठी प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठे हिनं खळबळजनक खुलासा केला आहे. श्रुतीनं सोशल मीडियावर ती कशापद्धतीनं मीटूची बळी ठरली याबाबतची सांगितलं आहे.

एका निर्मात्यानं मला लीड रोलसाठी ऑफर केली पण त्यासोबतच त्यानं मला एक रात्र झोपण्याची देखील ऑफर केली असं श्रुतीनं सांगितलं आहे. श्रुतीनं हे ह्युमन्स ऑफ मुंबई या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंटवर मांडलं आहे.

श्रुतीनं यासंबंधात एक मोठी पोस्ट लिहिली आहे. श्रुतीनं पोस्टमध्ये लिहिलं की, मी या इंडस्ट्रीमध्ये वयाच्या १६ व्या वर्षापासून आहे. लोकांचा खूप चुकीचा समज आहे की एक्ट्रेसेस यांची आयुष्य खूप कंफर्टेबल असतं पण हे पूर्णपणे चुकीचं आहे.

श्रुतीनं कास्टिंग काऊटचा अनुभव शेअर करताना लिहिलं की, एका सिनेमाच्या ऑडिशनच्या वेळी निर्मात्यानं मला लीड रोलसाठी ऑफर केली पण त्या ऑफरच्या ऐवजी त्यानं मला एक रात्र झोपण्याची ऑफर दिली. आधी तो निर्माता खूप प्रोफेशनल होता. त्यानंतर त्यानं कॉम्प्रोमाइज आणि वन नाइट स्टँड सारख्या शब्दांचा वापर करू लागला.

निर्मात्याला सोडावा लागला प्रोजेक्ट– श्रुतीनं पुढे पोस्टमध्ये लिहिलं की, मी त्या निर्मात्याला विचारलं तुम्हांला असं वाटतं की मी तुमच्यासोबत एक रात्र झोपू, मग तुम्ही हिरोसोबत कोणाला झोपायला सांगत आहात. मी हे बोलल्यावर निर्माता चकीत झाला. त्यानंतर मी त्याच्या या वागण्याबद्दल सगळ्यांना सांगितलं तेव्हा त्या निर्मात्याला तो प्रोजेक्ट सोडण्यास सांगितलं.

मला फिअरलेस बननण्यासाठी केवळ १ मिनिट लागल होता. मी केवळ माझ्यासाठी ही भूमिका घेतली नाही तर अन्य महिलांसाठी ही भूमिका घेतली ज्यांना दुसरी लोकं जज करतात. माझे कपडे मला डिफाईन करत नाहीत. माझं टॅलेन्ट, मेहनत आणि माझं यश मला निश्चित करतं. मला असं वाटतं की, ही गोष्ट समजून घेण्याची आता वेळ आली आहे.

साऊथ सिनेमात घातली होती बिकनी- श्रुतीनं साऊथ सिनेमामध्ये बिकनी घातल्याचा अनुभव शेअर केला आहे. करिअरच्या सुरूवातीला मला साऊथच्या एका सिनेमासाठी बिकनी घालण्यासाठी सांगितलं. त्यावेळी मी काहीही विचार न करता लगेचच होकार दिला.

बिकनी शूट कसं करणार? किंवा त्याची गरज आहे का ? असा कोणताच प्रश्न माझ्या मनात आला नाही. त्यावेळी मला सिनेमात काम करण्याची संधी मिळाली तेवढंच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं, असं श्रुतीनं पोस्टमध्ये लिहिलं आहे.

पण त्यानंतर जेव्हा मी मराठी इंडस्ट्रीमध्ये आली मला बिकनीवरून खूप ट्रोल करण्यात आलं. पण त्याचा विचार न करता मी माझं काम सुरू ठेवल्याचं देखील श्रुतीनं पोस्टमध्ये म्हटलं आहे. माघील काही वर्षांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीसह राजकारण, टीव्ही आणि मीडिया या सर्व इंडस्ट्रीमध्ये मीटू मोहिमेनं डोकंवर काढलं होतं.

अभिनेत्री तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्या लै गिं क छळाचा आरोप केला होता. त्यानंतर यासारखी बरीच प्रकरणं समोर आली होती. यात अनेक बड्याव्यक्तिंची नावं समोर आली. श्रुती मराठे हे मराठी इंडस्ट्रीमधली एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. श्रुतीनं मराठी सिनेमांसह हिंदी सिनेमा आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. तसंच श्रुतीनं २०१६ ला अभिनेता गौरव घाटणेकरसोबत लग्न केलं.

Team Beauty Of Maharashtra