ही सुप्रसिद्ध गायिका आहे आपल्या मराठमोळ्या सचित पाटीलची पत्नी, एखाद्या अभिनेत्री इतकीच आहे सुंदर

ही सुप्रसिद्ध गायिका आहे आपल्या मराठमोळ्या सचित पाटीलची पत्नी, एखाद्या अभिनेत्री इतकीच आहे सुंदर

क्यों या चित्रपटाद्वारे सचित पाटीलने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर सब कुछ है कुछ भी नही, रास्ता रोको यांसारख्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट काम केले. आणि त्या नंतर तो दिग्दर्शनाकडे फिरला.

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की संचितने दिग्दर्शित केलेला साडे माडे तीन सारखा पहिलाच चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. यानंतर त्याने अवधुत गुप्तेच्या निर्मित झेंडा या चित्रपटामध्ये खूप महत्त्वाची आणि मोठी भूमिका केली.

तसेच त्याने क्षणभर विश्रांती या चित्रपटात त्याने काम करण्या बरोबरच या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले. आणि चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यानंतर सचितने अर्जुन, क्लासमेट यांसारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका केल्या. सध्याच्या घडीला त्याची राधा प्रेम रंग रंगली ही मालिका चांगलीच गाजत आहे.

सचितची फॅन फॉलॉव्हिंग ही चांगलीच असून त्याच्याबद्दलच्या काही हटके गोष्टी आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. सचितची पत्नी ही प्रसिद्ध गायिका आहे. आणि तिने अनेक हिट गाणी गायली आहेत. त्याने नुकताच सोशल मीडियावर तिचा एक फोटो शेअर केला आहे.

नुकताच सचितच्या लग्नाचा वाढदिवस हा झाला. त्याने लग्नाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपल्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या पत्नीचे नाव शिल्पा आहे आणि तिने आजपर्यंत अनेक छान छान गाणी गायली आहेत.

तिने मराठी गाण्या बरोबर भोजपूरी भाषेत गाणी देखील गायली आहेत. सचितच्या क्षणभर विश्रांती या चित्रपटातील अनेक गाणी तिने गायलेली असून या गाण्यांना रसिकांची पसंती मिळाली आहे.

सचितच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर आपल्याला शिल्पाचे अनेक फोटो पाहायला मिळतात. त्या दोघांची जोडी त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. ते कमेंटच्या माध्यमातून नेहमीच याविषयी सांगत असतात.

Team Beauty Of Maharashtra