ता मंगेशकर यांच्या निधनानंतर नंतर मंगेशकर परिवाराला आणखी एक धक्का

ता मंगेशकर यांच्या निधनानंतर नंतर मंगेशकर परिवाराला आणखी एक धक्का

मराठी तथा हिंदी सिनेसृष्टीत अनेक जेष्ठ गायक व गायिका आहेत. यात अनेक गायक व गायिका यांचे नाव घेता येईल. रवींद्र साठे ,सुरेश वाडकर, आशा भोसले, लता मंगेशकर अथवा संपूर्ण मंगेशकर कुटुंबीय असे देखील आपल्या येथे उल्लेख करता येईल. मंगेशकर कुटुंबीय लतादींदी, आशा भोसले ,उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर असे संपूर्ण कुटुंब गायन क्षेत्रात प्रसिद्ध गायक आहेत.

भारतातील सर्वात लोकप्रिय गायिका म्हणजे लता मंगेशकर. लता मंगेशकर यांच्या सहा दशकांचा कार्यकाळ यशस्वी परिपूर्ण आहे. लतादीदींनी सगळ्यात जास्त त्यांच्या भावाचे म्हणजेच हृदयनाथ यांचे संगीतबद्ध केलेले गाणे गायले आहेत, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. लता मंगेशकर व आशा भोसले या दोघींनी सोबत अनेक गाणी गायली आहे.

हृदयनाथ मंगेशकर हे लतादीदींचे लहान बंधू आहेत. हृदयनाथ मंगेशकर हे प्रसिद्ध मराठी संगीतकार आहेत. हृदयनाथ मंगेशकर यांनी जैत रे जैत, उंबरठा, निवडूंग आणि हिंदी चित्रपटांना संगीत दिग्दर्शन केले आहे. त्यांची ओळख प्रामुख्याने महाराष्ट्राचे “भावगंधर्व” अशी करून देण्यात येते, ती त्यांच्या अनेक अनवट चालींनी सजलेल्या मराठी जगतातील गाजलेल्या मान्यवर मराठी कवी आणि गीतकार यांच्या कविता आणि गीतांमुळे.

हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीतामुळे आद्यकवी संत ज्ञानेश्वरांच्या काही रचना माणसांच्या ओठी रुळल्या आहेत. हृदयनाथ यांच्या ज्येष्ठ भगिनी म्हणजे लता मंगेशकर यांच्याकडून भगवद्गीतेतील काही श्लोक संगीतबद्ध करून लतादीदींनी कडून गाऊन घेतल्या आहेत आणि हे श्लोक अजरामर केले आहे.

हृदयनाथ मंगेशकर यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. २००९ साली भारत सरकारने हृदयनाथ मंगेशकर यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले. आहे. २०१४ सली पुणे नवरात्र महोत्सव तर्फे त्यांना पुरस्कार प्राप्त झाला आहे. २०१८ सालचा मटा सन्मान महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. ज्येष्ठ संगीतकार आणि गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना नुकतेच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. ह्रदयनाथ मंगेशकर लता मंगेशकर यांचे लहान भाऊ आहेत, तर दहा-बारा दिवसात त्यांना डिस्चार्ज दिला जाण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचे नेमकं कारण काय आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

काही दिवसांपूर्वीच भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळा पार पडला आहे. माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात मध्ये आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यात आदिनाथ मंगेशकर यांनी उपस्थित मान्यवरांना संबोधित केले आहे. हृदयनाथ मंगेशकर यांचा मुलगा आदिनाथ मंगेशकर यांनी वडील हृदयनाथ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

षण्मुखानंद सभागृहातील सत्कार समारंभात भाषण करताना हृदयनाथ मंगेशकर यांचा मुलगा आदिनाथ म्हणाला, गेल्या कित्येक वर्षांपासून माझे वडील हृदयनाथ मंगेशकर हे या कार्यक्रमाचे स्वागत भाषण देतात, त्या सोबतच ट्रस्ट बद्दल माहिती सांगतात. पण यावर्षी त्यांनाही करणे शक्य नाही. कारण त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच देवाच्या कृपेने येत्या आठ-दहा दिवसात घरी परततील.

सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यात सुधारणाही होत आहे, असे आदिनाथने सांगितले, तर तुम्हाला पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची गाणी आवडतात का? त्यांनी संगीतबद्ध केलेले कोणतं गाणं तुमच फेवरेट आहे. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी तुम्ही कमेंट मध्ये प्रार्थना करू शकता.

Team Beauty Of Maharashtra