मन उडू उडू झालं: दिपूच्या अपघाताचं सत्य येणार इंद्रासमोर; घरातल्यांसमोर फुटणार सानूचं बिंग

मन उडू उडू झालं: दिपूच्या अपघाताचं सत्य येणार इंद्रासमोर; घरातल्यांसमोर फुटणार सानूचं बिंग

‘मन उडू उडू झालं’ या मालिकेने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे. या मालिकेतील इंद्रा आणि दिपू या दोघांची हळूहळू खुलत जाणारी लव्हस्टोरी प्रेक्षकांना आवडत असून मालिकेत दररोज येणाऱ्या ट्विस्टमुळे ती अधिकच रंजक होताना दिसत आहे.

सध्या या मालिकेत देशमुख कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सानिकाच्या खोटारडेपणामुळे दिपूच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. परंतु, ही गोष्ट अद्यापही सानिकाने घरातल्यांपासून लपवून ठेवली आहे. मात्र, तिचं हे सत्य आता इंद्रासमोर येणार आहे.

सानिकाची समजूत काढायला गेलेल्या दिपूला सानू घरातून धक्के मारुन बाहेर काढते. यावेळी दिपूचा दगडावरुन पाय घसरतो आणि ती धावत्या वाहनासमोर येते. ज्यामुळे दिपूला जबर मार लागतो. इतकंच नाही तर दिपू सध्या कोमात असून अद्यापही सानिकाने या अपघातामागील कारण साऱ्यांपासून लपवून ठेवलं आहे. मात्र, तिचं सत्य आता लवकरच समोर येणार आहे.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये सानिका दिपूला पाहायला हॉस्पिटलमध्ये जाते. त्यावेळी इंद्रा, सानिकाला घडलेल्या प्रकाराविषयी विचारतो. मात्र, सानिका घाबरुन जाते आणि अडखळत बोलते. परंतु, यावेळी ती खोटी गोष्ट तयारी करुन सांगते. जी ऐकल्यानंतर कुठेतरी पाणी मुरतंय असा संशय इंद्राला येतो. त्यामुळे आता तो सत्तूच्या मदतीने दिपूच्या अपघाताचं कारण शोधून काढणार आहे.

दरम्यान, दिपूला भेटायला गेलेली सानिका या अपघातामागील खरं कारण कोणालाही सांगू नको असं बजावते. त्यामुळे दिपू सत्य परिस्थिती घरातल्यांना सांगेल का? किंवा इंद्रा या अपघाताचं खरं कारण शोधू शकेल का? या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत.

Team Beauty Of Maharashtra