‘मन उडू उडू झालं’ या मालिकेतील ‘शलाका’ आहे या प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी, जाणून घ्या

‘मन उडू उडू झालं’ या मालिकेतील ‘शलाका’ आहे या प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी, जाणून घ्या

झी मराठी वाहिनीवरील “मन उडू उडू झालं” ही नवी मालिका प्रेक्षकांना आवडत असल्याचे दिसत आहे. या मालिकेतील सगळ्याच भूमिका या अतिशय दर्जेदार रित्या झालेल्या आहेत. असे असले तरी गेल्या काही दिवसापासून या मालिकेचा टीआरपी काही प्रमाणात घसरला असल्याचे दिसत आहे.

त्यामुळे टीआरपी वाढवण्यासाठी या मालिकेमध्ये नवनवीन फंडे वापरून कथा ही वेगळ्या वळणावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहेत.
मालिकेत अभिनेत्री हृता दुर्गुळे ही दीपा ची भूमिका साकारत असून अभिनेता अजिंक्य राऊत इन्द्रा ही भूमिका साकारत आहे.

मालिकेत देशपांडे कुटुंबात शलाका, सानिका आणि दीपिकाच्या तीन मुले आहेत. लवकरच शलाका ही लग्न करून अमेरिकेला जाणार असल्याने देशपांडे कुटुंबात तिच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, तिच्या सासऱ्याकडून त्यांच्या लग्नासाठी नको ती मागणी केली जात आहे.

ही मागणी पूर्ण करताना देशपांडे कुटुंबाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मालिकेत शलाका हे पात्र घाबरट आणि लगेच वाईट वाटून घेणारे दर्शवले आहे. ही भूमिका शर्वरी कुलकर्णी साकारत आहे. अभिनेत्री शर्वरी कुलकर्णी कुलकर्णी या मालिके अगोदर सोनी मराठी वाहिनीवरील “आनंदी हे जग सारे” या मालिकेतुन छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते.

यात तिने मीराची भूमिका साकारली होती. शर्वरी कुलकर्णी ही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री संपदा कुलकर्णी यांची मुलगी आहे. संपदा कुलकर्णी या मराठी चित्रपट मालिका तसेच नाटकात एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात.

गेल्या काही वर्षापासून संपदा कुलकर्णी पती राहुल कुलकर्णी यांच्यासोबत कोकणातील गावात राहत असून शेती करताहेत. “आनंदाची शेती”च्या माध्यमातून ते इतरांना देखील शेती व्यवसायात येण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. प्रसार माध्यमातून त्यांच्या आनंदाची शेती या प्रोजेक्टची माहिती अनेकदा दिली गेली आहे.

त्यामुळे संपदा कुलकर्णी अभिनय सोडून शेती क्षेत्राकडे वळलेल्या अभिनेत्री म्हणूनही चर्चेत आल्या होत्या. आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकत त्यांची मुलगी शर्वरी हीदेखील अभिनय क्षेत्रात आपला जम बसवू पाहत आहे. “मन उडू उडू झाल”या मालिकेतील या भूमिकेसाठी शर्वरी हिने अप्रतिम असे काम केले आहे.

तर आपल्याला मन उडू उडू झालं मधील शर्वरी हिचा अभिनय आवडतो का? त्या मला नक्की सांगा.

Team Beauty Of Maharashtra