बॉलिवूडमधून मोठी बातमी ! मलायका आणि अर्जुन कपूर यांचं ब्रेकअप, अभिनेत्री शॉकमध्ये

बॉलिवूडमधून मोठी बातमी ! मलायका आणि अर्जुन कपूर यांचं ब्रेकअप, अभिनेत्री शॉकमध्ये

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जून कपूर यांच्या ब्रेकअप झाल्याचे वृत्त समोर आले आहे. चार वर्षांच्या रिलेशनशिपनंतर या कपलने विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचे एका अहवालात समोर आले आहे.

या दोन्ही कलाकारांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केल्यापासून त्यांच्या नात्याची चर्चा बी-टाउनमध्ये होत होती. त्यांचे इन्स्टाग्रामवर अनेक रोमँटिक फोटोज देखील व्हायरल झाले आहेत. अनेकदा सार्वजनिक ठिकाणी हे कपल एकत्र दिसायचे.

आता त्यांचे मार्ग वेगळे झाल्याचे वृत्त समोर आल्याने चाहत्यांना आश्चर्य वाटत आहे.मलायका अरोरा आणि अर्जून कपूर यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त BollywoodLife.com ने दिले आहे. एका सूत्राने या पोर्टलला दिलेल्या माहितीनुसार, ‘सहा दिवसांहून अधिक काळ मलायका अरोरा घरातून बाहेर पडलेली नाही.

ती पूर्णपणे आयसोलेशनमध्ये आहे. ती अत्यंत दु:खी असून काही काळ जगापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे समजते आहे. तर अर्जुन कपूरही या दिवसांत एकदाही तिला भेटायला गेलेला नाही. अर्जुन तीन दिवसांपूर्वी बहिण रिया कपूरच्या घरी डिनरसाठी गेला होता.

रियाचे घर मलायकाच्या घराच्या अगदी जवळ आहे आणि तरीही तो डिनरनंतर तिला भेटला नाही. मलायका सहसा अर्जुनसोबत अशा फॅमिली डिनरला हजेरी लावते पण यावेळी ती त्याच्यासोबत दिसली नाही.’काही दिवसांपूर्वीच मलायकाने अर्जून कपूरला मिस करत असल्याचं कॅप्शन देत एक फोटो शेअर केला होता.

ज्यात दोघेजण व्हेकेशन एंजॉय करत असल्याचं दिसत होते. हा फोटो शेअर करत तिने अर्जूनला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. अर्जूनने देखील हाच फोटो पोस्ट करत नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. आठवडाभरातच त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे.

मलायका आणि अर्जुन अनेकदा सोशल मीडियावर त्यांच्या हटके फोटोंमुळे चर्चेत असतात. त्याच्या नात्याबाबत बऱ्याच अफवा पसरल्यानंतर त्यांनी शेवटी 2019 मध्ये ते रिलेशनशिपमध्ये असल्याचं मान्य केलं होतं. अर्जूनसह असणाऱ्या नात्यापूर्वी मलायकाने अभिनेता अरबाज खान याच्याशी 1998 मध्ये लग्न केलं होतं.

त्यांना अरहान हा मुलगा देखील आहे. 2016 मध्ये या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.

Team Beauty Of Maharashtra