“मला पुरुषाची गरज नाही” म्हणत ‘या’ अभिनेत्रीने स्वतःशीच केलं लग्न

“मला पुरुषाची गरज नाही” म्हणत ‘या’ अभिनेत्रीने स्वतःशीच केलं लग्न

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘दिया और बाती हम’ फेम अभिनेत्री कनिष्का सोनीने एक मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कनिष्काने लग्न केल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणचे तिने स्वतःशीच लग्नगाठ बांधली आहे. तिच्या वाढदिवशी तिने चाहत्यांशी लग्नाबद्दलची माहिती शेअर केली.

लग्नाबद्दलची पोस्ट शेअर करताना तिने लिहिलं की, “मी स्वतःवर प्रेम करते आणि मला माझ्यापेक्षा प्रामाणिक कोणीही सापडत नाहीये. त्यामुळे आता मी फक्त माझ्याशीच कमिटेड आहे.” आणखी एक फोटो शेअर करत तिने लिहिलं की, “मी माझे प्रत्येक स्वप्न पूर्ण केल्यामुळे मी स्वतःशी लग्न केले. मी माझ्यावर प्रेम करणारी व्यक्ती आहे. माझं माझ्यावर खूप प्रेम आहे, त्यामुळे मला कोणत्याही पुरुशाची गरज नाही. मी एकटी आणि माझ्या गिटारसह खूप आनंदी आहे. मी देवी आहे, बलवान आणि सामर्थ्यवान आहे. शिव आणि शक्ती हे सर्व माझ्यात सामावलेले आहेत,” असं कनिष्काने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.

कनिष्का सोनी हिने तिचा निर्णय योग्य असल्याचं सांगत आनंद व्यक्त केला आहे. तिच्या लग्नाबद्दल कळाल्यानंतर तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय. या ट्रोलिंगवरही कनिष्का तिचं मत मांडत आहेत. कनिष्काने ‘पवित्र रिश्ता’, ‘देवी आदि पराशक्ती’ यांसारख्या मालिकांमध्येही भूमिका साकारल्या होत्या. काही काळ छोट्या पडद्यावर लहान मोठ्या भूमिका साकारणाऱ्या कनिष्काने हॉलिवूडमध्ये चांगले प्रोजेक्ट्स मिळावेत म्हणून टीव्ही इंडस्ट्री सोडली होती.

दरम्यान, स्वतःशी लग्न करणारी अभिनेत्री कनिष्का सोनी ही पहिली तरुणी नाही. तर, यापूर्वी गुजरातमधील वडोदरा येथील क्षमा बिंदू नावाच्या तरुणीने जून महिन्यात स्वतःशीच लग्न केलं होतं. स्वतःशी लग्न करण्याला सोलोगॅमी असं म्हटलं जातं.

Team Beauty Of Maharashtra