मांजरेकरांनी जीभ घसरली ! ‘आतमध्ये येऊन एकाएकाला चांगलंच चोपेल..’ जाणून घ्या नेमकं काय घडलंय

कलर्स मराठीवर सुरू असलेल्या बिग बॉसचा तिसऱ्या पर्वामध्ये आता नाट्यमय घटना घडामोडी घडताना दिसत आहेत. कारण की महेश मांजरेकर यांनी नुकतीच बिग बॉसच्या घरात असलेल्या सदस्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. घरामध्ये आता एकूण अकरा सदस्य राहिलेले आहेत.
या शोमध्ये सहभागी झालेल्या कलाकारांबद्दल अनेक पोल देखील घेण्यात येतात. बिग बॉस घरामध्ये जय दुधाने, मीरा जगन्नाथ यांचा गेम आता बऱ्यापैकी चांगला होताना दिसत आहे. मात्र, उत्कर्ष शिंदे आणि दादूस म्हणजे संतोष चौधरी हे काही विशेष खेळतांना दिसत नाहीत.
त्यात त्यातल्या त्यात दादूस काही विशेष गेम खेळताना दिसत नाहीत. जय आणि उत्कर्ष जे बोलतात त्याला फक्त दादुस हो ला हो करत असतात. त्यांचा गेम अजून काही समोर आलेला नाही. आता मीरा जगन्नाथ ही कॅप्टन झालेली आहे आणि मीरा जगन्नाथच्या सांगण्यानुसार या आठवड्यामध्ये एका सदस्याला बाहेर जावे लागणार आहे, असे देखील सांगण्यात येत आहे.
कारण की, याबाबतचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये असे सांगण्यात आले आहे की, मीरा सांगेल तो सदस्य घराबाहेर जाईल. त्यामुळे आता कोण घराबाहेर जातो हे देखील पहाणे फार मजेशीर ठरणार आहे. बिग बॉस हा शो सुरू झाला त्यावेळेस महेश मांजरेकर हे आजारी होते, असे असतानाही महेश मांजरेकर यांनी या शोचा प्रोमो शुट केला.
तसेच त्यांनी याबाबत पत्रकारांना देखील माहिती दिली होती. मी आजारी होतो तरीदेखील मी या शोच्या प्रोमो चे चित्रीकरण केले. कारण एखाद्या चित्रपटाचे चित्रीकरण रखडले तर पुढे काय होते, याचा चांगला अनुभव मला आलेला आहे, असे देखील ते म्हणाले. कारण की मी गेल्या अनेक वर्षापासून या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे, असेही ते म्हणाले.
बिग बॉसच्या घरातून आत्तापर्यंत अक्षय वाघमारे, आदिश वैद्य, सुरेखा कुडची, अविष्कार दारव्हेकर आणि आता तृप्ती देसाई यांचे देखील नॉमिनेशन झालेले आहे. तर या बिग बॉसच्या घरामध्ये स्नेहा वाघ हिच्यावर आता सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
कारण स्नेहा वाघ हिला घराच्या बाहेर काढा अशी मागणी देखील अनेक जण करत आहेत तर गायत्री दातार म्हणजेच बुगुबुगु हिला घराच्या बाहेर काढा, असे देखील अनेक जण म्हणताहेत. नुकत्याच झालेल्या भागामध्ये महेश मांजरेकर हे सगळ्याच सदस्यावर खूप भडकल्याचे दिसत होते.
महेश मांजरेकर यांचा हा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ते सदस्यांना म्हणत आहेत की, मी जे बोलतो त्याचे आपण भांडवल करायच नाही. एकमेकांशी चर्चा करायची नाही. कारण मला बोलण्याचा तुम्हाला अधिकार आहे.
यापुढे जर असे प्रकार घडले तर मी घराच्या मध्ये येऊन तुम्हाला सगळ्यांना चोपून काढेल, असे देखील महेश मांजरेकर म्हणाले. महेश मांजरेकर यांचे भडकवण्याचे एवढे कारण काय, असा प्रश्न देखील अनेकांना पडलेला आहे.
मात्र, काही सदस्यांनी महेश मांजरेकर आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शनिवारी सदस्यांना उद्देशून जे बोलतात त्यावरून काही जणांनी गॉसिपिंग केले असण्याची शक्यता आहे. तर आपल्याला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.