माहेरच्या साडी चित्रपटासाठी ही बॉलिवूड अभिनेत्री होती दिग्दर्शकांची पहिली पसंती.. मात्र, तिने सुनावले असे काही की…

माहेरच्या साडी चित्रपटासाठी ही बॉलिवूड अभिनेत्री होती दिग्दर्शकांची पहिली पसंती.. मात्र, तिने सुनावले असे काही की…

अलका कुबल हे नाव मराठी चित्रपट सृष्टीसाठी अतिशय परिचित आहे. अलका कुबल यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर आज अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अलका कुबल सध्या छोट्या पडद्यावर देखील काम करत आहेत. अलका कुबल यांनी उंबरठ्याच्या आत मधले अनेक चित्रपट केले आहेत.

अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी अन्याय सहन करणाऱ्या सुनेचा रोल केलेला आहे. 90 च्या काळामध्ये मराठी चित्रपट सृष्टी नव्या दिशेला जात होती. त्यावेळी अलका कुबल यांनी देखील आपल्या करिअरमध्ये अनेक महत्वकांक्षी भूमिका केल्या आहेत. लेक चालली सासरला या चित्रपटातून अलका कुबल यांनी पदार्पण केले होते. या चित्रपटात त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केले होते. त्यामुळे अलका कुबल या घराघरात पोहोचत होत्या.

काही दिवसांपूर्वीच एका मालिकेच्या सेटवर त्यांचा प्राजक्ता गायकवाड या अभिनेत्रीसोबत वाद झाला होता. प्राजक्ता गायकवाड हिने पत्रकार परिषद घेऊन अलका कुबल यांच्यावर आरोप लावले होते. त्यानंतरही हे प्रकरण अजूनही सुरूच आहे. मात्र, अलका कुबल यांच्या इमेज व त्याचा काही परिणाम झालेला दिसत नाही.

माहेरची साडी या चित्रपटातील अलका कुबल यांनी चारचाँद लावले होते. या चित्रपटात अजिंक्य देव, रमेश भाटकर यांच्या भूमिका होत्या. या चित्रपटात उषा नाडकर्णी यांनी अतिशय खाष्ट सासू ची भूमिका निभावली होती. ही भूमिका आजही अनेकांच्या स्मरणात आहे. हा चित्रपट त्यावेळी एवढा चालला होता की, चित्रपटाचे तिकीट मिळणे देखील मुश्किल झाले होते.

अनेक जण ब्लॅक मध्ये तिकीट घेऊन चित्रपट पाहत होते. चित्रपट हा त्यावेळी 50 आठवडे चालला होता. त्यामुळे अलका कुबल यांची मागणी चांगलीच वाढली होती. चित्रपटातील इतर पात्र देखील खूप चांगले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय कोंडके यांनी केले होते. हा चित्रपट 1991 मध्ये आला होता. मात्र, या चित्रपटाचा एक रंजक किस्सा समोर आला आहे आणि हा किस्सा आपल्याला सांगणार आहोत.

विजय कोंडके हे मराठीतील तसे त्यावेळी नवखे दिग्दर्शक होते. त्यामुळे त्यांच्याकडे काम करण्यास हिंदी चित्रपटातील अभिनेत्री सपशेल नकार देत होत्या. मात्र, विजय कोंडके यांना हिंदी चित्रपटातील एखादी अभिनेत्री आपल्या चित्रपटासाठी घ्यायची होती.1989 मध्ये मैने प्यार किया हा चित्रपट आला होता. या चित्रपटामध्ये सलमान खानची भूमिका या चित्रपटात भाग्यश्री पटवर्धन हिने भूमिका करून चारचांद लावले होते.

हा चित्रपट त्यावेळी एवढा चढला होता की, अनेकांची रग्गड झाली होती. त्यानंतर भाग्यश्री हिने काही मोजक्याच चित्रपटात भूमिका केल्या होत्या. हा चित्रपट झाल्यानंतर तिने लगेचच हिमालय या अभिनेत्यासोबत लग्न केले. आज भाग्यश्रीला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दोन्ही मुले चित्रपट सृष्टीत येण्यासाठी झगडत आहेत. त्या वेळचा एक किस्सा आता समोर आला आहे.

विजय कोंडके यांना आपल्या चित्रपटासाठी भाग्यश्रीला घ्यायचे होते. त्यासाठी त्यांनी भाग्यश्री हीची अपॉइंटमेंट देखील घेतली होती. मात्र, अपॉइंटमेंट घेऊन देखील विजय कोंडके यांना ती वेळ देत नव्हती. विजय कोंडके यांनी सलग दीड वर्ष भाग्यश्रीकडे या चित्रपटासाठी विचारणा केली. मात्र, भाग्यश्री काही तयार होईना.

शेवटी भाग्यश्री हिने चित्रपट करण्यास त्यांना स्पष्टपणे नकार दिला आणि त्यानंतर विजय कोंडके यांनी भाग्यश्रीचा नाद सोडून दिला. त्यानंतर विजय कोंडके यांनी लेक चालली सासरला हा चित्रपट पाहिला होता. त्यामुळे त्यांनी या चित्रपटासाठी अलका कुबल यांना विचारणा केली. अलका कुबल यांनी चित्रपटात होकार दिला आणि हा चित्रपट सर्वांसमोर आला.

त्यानंतर चित्रपटाला यश मिळाले ते आपल्यासमोर आहेच. त्यामुळे भाग्यश्रीच्या मनात नक्कीच रुखरुख नक्कीच राहिली असेल. मात्र, हा चित्रपट अलका कुबल यांना मिळाला आणि अलका कुबल या सुपरस्टार झाल्या.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Beauty Of Maharashtra