महादेव या फुलांनी होतात प्रसन्न, श्रावणात तुम्ही सुद्धा पूजेच्या वेळी ही फुले वाहा

श्रावण महिना हा भगवान शिवाची पूजा करून इच्छित वर मागण्याचा महिना आहे. श्रावणात भगवान शंकराला प्रिय असे जे जे असेल आपण त्याची तयारी करतो आणि त्यांना प्रसन्न करून आपल्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतो. या कामी नैसर्गिक रित्या उपलब्ध असलेली फुले जर तुम्ही वाहिली तर त्यात अधिकच भर पडेल. भगवान शिवाला काही फुले खूपच प्रिय आहेत. जर ती फुले तुम्ही पूजा करताना अर्पण केलीत तर भगवान शंकर तुमचे मागणे पूर्ण करतील. आज तुम्हाला अशाच काही फुलांबद्दल माहिती देत आहोत…
बेलाच्या पानाने भगवान शिव यांची पूजा केल्याने संकटे दूर होतात
दुर्वापुजा केल्याने दीर्घायुष्याची प्राप्ती होते. हरसिंगार फुलांनी पूजा केल्यास जीवनात सुख-संपत्ती व समृद्धीचा वास असतो.
चमेलीचे फुल वाहिल्यास वाहन तसेच सुख-समृद्धी प्राप्त होते.
धोत्र्याचे फुल वाहिल्याने भगवान शंकराच्या कृपेने सुयोग्य पुत्रप्राप्ती होते, जो तुमच्या कुळाचे नाव मोठे करतो. आकड्याच्या फुलाने पूजा केल्यास आपल्याला तसेच पितरांना मोक्ष प्राप्त होतो.
अळशीच्या फुलाने पूजा केल्यास मनुष्य सर्व देवतांना प्रिय होतो.
क्षमीच्या पानांनी पूजा केल्यास मोक्ष मिळतो. कण्हेरीच्या फुलांनी पूजा केली तर नवीन कपडे मिळतात. लाल देठ असलेले धोत्र्याचे फुल पूजेत वापरणे शुभ मानले जाते.
बेलाची फुले वाहिल्यास इच्छित जोडीदार मिळतो. जुहीच्या फुलांनी पूजा केल्यास व्यवसायात तसेच धन-धान्यात कधीच कमतरता निर्माण होत नाही.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.