लोकप्रिय अभिनेत्रीने गळफास घेत संपवले जीवन; प्रसिद्ध मालिकांमध्ये केले आहे का

लोकप्रिय अभिनेत्रीने गळफास घेत संपवले जीवन; प्रसिद्ध मालिकांमध्ये केले आहे का

प्रसिद्ध टीव्ही कलाकार वैशाली ठक्करने गळफास घेत स्वत:चे जीवन संपवल्याची घटना घडली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर टीव्ही विश्वाला मोठा धक्का बसला आहे. मीडिया रिपोर्टनुसार हे प्रकरण तेजाजी नगर पोलीस स्टेशन भागात घडले आहे. पोलिसांनी याप्रकरणी केस दाखल करत अभिनेत्रीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहे. पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. ‘ यह रिश्ता क्या कहलाता है’ सारख्या मालिकांमध्ये तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती.

या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांना याठिकाणी एक नोटही मिळाली असून त्यावरुन पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. अद्याप वैशालीने असे टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण समोर आलेले नाही.

वैशाली गेल्या एक वर्षापासून इंदौरमध्ये राहत होती. याठिकाणीच तिने गळफास लावून जीव दिला. तेजाजी नगर पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून त्यांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही सापडली आहे. प्राथमिक तपासात ही घटना प्रेमप्रकरणातून झाल्याचे सांगण्यात येत आहे.

ही दु:खद बातमी ऐकून तिचा मित्रपरिवार आणि कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे . टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर चाहते वैशालीच्या जाण्याने दु:ख व्यक्त करत आहेत. तिने हे टोकाचे पाऊल का उचलले असावे, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. घटनेमागील सत्य जाणून घ्यायचे आहे की वैशालीने असे पाऊल कशामुळे उचलले.

वैशाली ‘सुसरल सिमर का’ आणि ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांसाठी ओळखली जाते. तिने ‘ससुराल सिमर का’ मालिकेत ‘अंजली भारद्वाज’ आणि ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत ‘संजना’ ही व्यक्तिरेखा साकारली होती. २०१५ ते २०१६ या काळामध्ये ती मालिकांमध्ये दिसली होती. सोशल मीडियावरही वैशाली विशेष सक्रिय होती. वैशालीने ‘सुपर सिस्टर्स’, ‘विश या अमृत’, ‘मनमोहिनी २’ आणि ‘ये है आशिकी’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

Team Beauty Of Maharashtra