वाईट नजर दूर करण्यासाठी का केला जातो लिंबू- मिरचीचा टोटका, जाणून घ्या कारण

वाईट नजर दूर करण्यासाठी का केला जातो लिंबू- मिरचीचा टोटका, जाणून घ्या कारण

लोक बर्‍याचदा वाईट समस्या टाळण्यासाठी लिंबू-मिरचीचा युक्त्या वापरतात हे आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसून येते. पण लिंबू आणि मिरची टोटक्यात का वापरली जाते हे आपणास ठाऊक आहे का ? बऱ्याच लोकांना त्याबद्दल माहिती नसते तरीही ते हा टोटका अवलंबतात.

आज आम्ही तुम्हाला सांगते की लिंबू आणि मिरची का वापरण्यात येते. असा विश्वास आहे की श्रीमंतीची देवी लक्ष्मीची मोठी बहीण दरिद्रा आहे जी आई लक्ष्मीचा अपमान व अनादर करणाऱ्यांच्या आयुष्यात अडचणी व समस्या उभ्या करते.

गरिबीच्या नावाखाली लोक घाबरू लागतात हे खरं आहे. आणि म्हणूनच. गरीबीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ते बरेच मार्ग अवलंबतात. त्यातील एक म्हणजे लिंबू-मिरचीचा टोटका. कारण दारीद्राला आंबट आणि मसालेदार अन्न आवडते. म्हणूनच लिंबू आणि मिरची घराच्या किंवा दुकानाच्या बाहेर लटकवल्या जातात जेणेकरून दारीद्रा ची इच्छा बाहेरच पूर्ण व्हावी आणि ती बाहेरूनच परत जावी.

घराला कोणाचीही नजर लागली आले असेल तर कुटूंबाच्या एका माणसाने पीडित व्यक्तीच्या डोके ते पाय असे ७ वेळा लिंबू उतरवावे. नंतर लिंबाचे ४ तुकडे करावे आणि एका निर्जन जागी फेकून द्यावे. लिंबाचे तुकडे फेकल्यावर मागे वळून पाहू नका अन्यथा त्याचा परिणाम होत नाही.

जर दिवसरात्र मेहनत करूनही आपला व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल, हवे तसे उत्पन्न मिळत नसेल तर शनिवारी, एक लिंबू घ्या आणि त्यास दुकान किंवा ऑफिसच्या चारही भिंतींना स्पर्श करा. त्यानंतर ते लिंबाचे 4 तुकडे करा आणि लिंबाचे तुकडे चारही दिशेने फेकून द्या.असे केल्यास नकारात्मक उर्जा नष्ट होते.

जर आपली कामे होता होता बिघडून जात असतील, किंवा एखादे काम करण्याचा योग येत नसेल तर आपण एक लिंबू घ्या आणि आपल्या डोक्यावरुन सात वेळा फिरवून त्याचे दोन तुकडे करा. डाव्या हातातील तुकडा उजवीकडे व उजव्या हातातील तुकडा डावीकडे फेका. ह्यामुळे तुमची अडलेली कामे पूर्ण होतील.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Beauty Of Maharashtra