लिटल चॅम्प मध्ये धुमाकूळ घालणारी ही बाल गायिका आहे दिग्गज कलाकाराची मुलगी, जाणून घ्या

लिटल चॅम्प मध्ये धुमाकूळ घालणारी ही बाल गायिका आहे दिग्गज कलाकाराची मुलगी, जाणून घ्या

साधारणतः बारा वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर सारेगमपा ही संगीत रजनी सुरू झाली होती. काही वर्षांपूर्वी देशामध्ये दूरदर्शन केवळ एकच वहिनी होती. त्यानंतर कालांतराने टेलिव्हिजनने क्रांती केली आणि प्रेक्षकांची निकड म्हणून झी हा समूह भारतामध्ये सुरू झाला. त्यानंतर झी ने प्रचंड धुमाकूळ घालत हिंदीमध्ये आपली पहिली वाहिनी सुरू केली. त्यानंतर या वाहिनीचे प्रादेशिक भाषांमध्ये देखील वेगवेगळे चैनल सुरू झाले.

आज प्रत्येक भाषेमध्ये ही वाहिनी आहे. काही वर्षांपूर्वी सारेगमपा हा शो प्रचंड गाजला. या शोमध्ये अनेक बाल कलाकार आले होते. या कलाकारांनी पुढे जाऊन आपले करियर देखील खूप मोठ्या प्रमाणात गाजवले. त्यानंतर इतर वाहिन्यांनी देखील असे शो सुरू करण्याला सुरुवात केली. सोनी वर इंडियन आयडल हा शोध देखील खूप मोठ्या प्रमाणात गाजत आहे. इंडियन आयडल ने अनेक कलाकार या बॉलिवूडला दिले आहे. त्यामध्ये आज नेहा कक्कर ही गायिका या शोच्या माध्यमातून मोठी झाली आहे.

त्याचबरोबर सलमान आली हा गायक देखील या शोच्या माध्यमातून वर आलेला आहे. अर्जित सिंह हा गायकही या शोच्या माध्यमातून वर आलेला आहे. आज आम्ही आपल्याला झी मराठीवर सुरू असलेल्या सा रे ग म प लिटल चॅम्प या शो बद्दल माहिती देणार आहोत. हा शो गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. ज्या प्रेक्षकांना मराठी चित्रपट व संगीताची आवड आहे, ते प्रेक्षक हा शो आवर्जून पाहत असतात.

या शोमध्ये येणारे बालकलाकार देखील खूप गाजले आहेत. यामध्ये कार्तिकी गायकवाड आणि इतर कलाकारांची नाव घ्यावे लागते. या शोमध्ये त्यांनी आपली चमक दाखवली आणि त्यानंतर त्यांना इतर मालिका व चित्रपटात देखील गायन गाण्याची संधी मिळाली.आज आम्ही आपल्याला सा रे ग म प लिटल चॅम्प या शोमध्ये सध्या धुमाकूळ घालत असलेल्या एका बाल कलाकारा बद्दल माहिती देणार आहोत. या शोचे सूत्रसंचालन मृण्मयी देशपांडे ही अभिनेत्री करत आहे. हा शो प्रेक्षकांना खूप आवडत आहे.

गेल्या आठवड्यात सर्व बाल कलाकारांनी चांगले गाणे म्हणलेले आहे. मात्र, यामध्ये ही पोरगी साजुक तुपातली हे गाणं म्हणणारी मुलगी सध्या चर्चेत आलेली आहे. हे गाणं म्हणताना तिने केलेले हावभाव प्रेक्षकांना खूप आवडले आहे. या बाल गायिकेचे नाव स्वरा जोशी असे आहे. स्वराज जोशी हिचा जन्म मुंबईत झालेला असून ती दादर मध्ये राहते. दादर येथे ती साने गुरुजी इंग्लिश मीडियम मध्ये तिसरी ला शिकते आणि तिचे वय हे आठ वर्षे आहे.

विशेष म्हणजे स्वरा जोशी हिची आई केतकी भावे जोशी हीदेखील गायिका आहे. त्याचप्रमाणे तिचे वडील अभिजित जोशी देखील या क्षेत्राशी संबंधित आहे. केतकी जोशी यांनी अनेक अल्बम मध्ये देखील गायन केलेले आहे. त्यामुळे स्वरा जोशी हिची आईही चांगली मोठी कलावंत आहे.

Team Beauty Of Maharastra