लक्ष्मी कृपेने २७ एप्रिलपासून ‘या’ राशींना चहुबाजूने मिळणार धन? गुरु उदय होताच श्रीमंती चालून दारी येऊ शकते

लक्ष्मी कृपेने २७ एप्रिलपासून ‘या’ राशींना चहुबाजूने मिळणार धन? गुरु उदय होताच श्रीमंती चालून दारी येऊ शकते

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या ग्रहाचा जेव्हा उदय होतो किंवा अस्त होतो तेव्हा त्याचा प्रभाव सर्व राशींवर पडतो. एप्रिल महिन्यात ग्रह गोचरासह ग्रहांचे उदय सुद्धा होणार आहेत. २२ एप्रिलला गुरुदेव स्वराशीत म्हणजेच मेष राशीत प्रवेश घेणार आहेत तर पाच दिवसांनी म्हणजेच २७ एप्रिलला गुरूचा उदय होणार आहे. २७ एप्रिलला मेष राशीत गुरु उदय झाल्यावर काही राशींवर त्याचा अत्यंत शुभ प्रभाव दिसून येणार आहे. मुख्य म्हणजे या काळात शनिदेव सुद्धा दशमी स्थानी शक्तिशाली असणार आहेत त्यामुळे अनेक राजयोग सुद्धा तयार होत आहेत. या एकूण ग्रह युती व प्रभावांनी कोणत्या राशीवर नेमका कसा प्रभाव पडणार आहे हे पाहूया…

२७ एप्रिलपासून ‘या’ राशी होतील लखपती?
मेष रास- गुरुदेव मुळात मेष राशीतच गोचर व उदित होणार असल्याने मेष राशीला यापुढील काळ हा अत्यंत शुभ व लाभदायक सिद्ध होऊ शकतो. तुमच्या कुंडलीत लग्न सुख आहे म्हणजेच तुम्हाला प्रेमाच्या माणसाची मोठी मदत मिळू शकते. जोडीदाराच्या रूपात लक्ष्मीचा आशीर्वाद लाभू शकतो. काहींना या काळात परदेश वारीचे सुद्धा योग आहेत.

मिथुन रास – मिथुन राशीसाठी गुरु उदय हा धनलाभाचे संकेत आहे. मिथुन राशीच्या मंडळींना नोकरीच्या नव्या संधी चालून येऊ शकतात. तुम्ही ज्यासाठी इतकी विरह प्रयत्न करत होतात ती कामी या महिन्याच्या अखेरीस पूर्णत्वास लागू शकतात. नोकरीत बदल झाल्याने धनलक्ष्मीचा आशीर्वाद लाभू शकतो. कुटुंबाची भक्कम साताठ तुम्हाला मानसिक सुख अनुभवण्याची संधी देऊ शकतात.

सिंह रास – सिंह रास ही गुरु प्रभावाने आयुष्यातील सर्वात सुखाचा काळ अनुभवू शकणार आहे. तुम्हाला येत्या काळात भावंडांच्या रूपात प्रचंड प्रेम व प्रगती अनुभवता येतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना यशाच्या दिशेने वाटचाल करता येईल. तुमचे अडकलेले धन पुन्हा प्राप्त होऊ शकते.

कुंभ रास – कुंभ राशीत शनीची साडेसाती सुरु आहे पण कुंभ ही शनीची मूळ त्रिकोण रास आहे त्यामुळे कुंभ राशीस या काळात लाभ अनुभवता येऊ शकतो. गुरु ग्रह तुम्हाला शांती अनुभवण्याची संधी देऊ शकतो. गुरु ग्रह तुम्हाला शीतल छाया अनुभवण्याची संधी देऊ शकतो. तुमचे मनोबल वाढल्याने तुम्ही वाणीच्या जोरावर धनलाभ मिळवू शकता.

Team BM