कोई मिल गया’ फेम प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचे निधन, हृदयविकाराने घेतला जीव

बॉलिवूडमधून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचे निधन झाल्याची घटना घडली आहे. मिथिलेश चतुर्वेदी यांनी ३ ऑगस्टच्या रात्री लखनऊमध्ये अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून ते हृदयाशी संबंधित समस्येचा सामना करत होते. रिपोर्ट्सनुसार, मिथिलेश चतुर्वेदी यांना काही काळापूर्वी हृदयविकाराचा झटका आला होत. त्यांनतरच ते त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी मूळ गावी लखनऊला गेले होते.
मिथिलेश चतुर्वेदी यांच्यासोबत ‘क्रेझी 4’ आणि ‘कोई मिल गया’ या सिनेमात काम केलेले दिग्दर्शक जयदीप सेन यांनी नवभारत टाइम्स ऑनलाइनशी बोलताना असे सांगितले की, मिथिलेश चतुर्वेदी यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे ते तब्येतीत सुधारणा करण्यासाठी त्यांच्या मुळ गावी लखनऊ याठिकाणी गेले होते. ३ ऑगस्टच्या रात्री त्यांचे निधन झाले.
जयदीप सेन सांगतात की, ‘मिथिलेशजींसोबत माझे खूप जवळचे नाते होते. मला त्याच्यासोबत ‘कोई मिल गया’ आणि ‘क्रेझी 4’ मध्ये काम करण्याचे सौभाग्य मिळाले. ‘क्रेझी 4’ हा माझा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट होता. जेव्हा आपण एखाद्याला इतक्या जवळून ओळखता तेव्हा खूप त्रास होतो. त्यांच्यासोबत काम केले आहे. त्यांच्या कौशल्याचा आणि प्रतिभेचा बारकाईने वापर करून घेता आला. अशी चांगली माणसे जग सोडून जातात तेव्हा खूप त्रास होतो.