“पहिल्यांदा किस करताना मला…”, गिरिजा ओकने सांगितला कॉलेजमधला ‘तो’ विचित्र अनुभव

“पहिल्यांदा किस करताना मला…”, गिरिजा ओकने सांगितला कॉलेजमधला ‘तो’ विचित्र अनुभव

पूर्वीच्या जमान्यामध्ये महिलांना चित्रपटात काम करणे हे निषिद्ध मानले जायचे. मात्र, कालांतराने यामध्ये बदल होत गेला. साठच्या दशकामध्ये अनेक अभिनेत्री या चित्रपटामध्ये होत्या. त्यावेळेस बोल्ड दृश्य देणे ही संकल्पना कुणालाही मान्य नव्हती.

मात्र, अनेक अभिनेत्रींनी दिग्दर्शकांच्या मागणीनुसार अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड सीन दिले. कालांतराने हा ट्रेंड हळूहळू बॉलिवूडमध्ये रुजत गेला. 80 90 च्या दशकामध्ये माधुरी दीक्षित हिचा दयावान हा चित्रपट आला होता. या चित्रपटामध्ये माधुरी हिने विनोद खन्ना यांच्यासोबत अतिशय जबरदस्त किसिंग सीन आणि बोल्ड सीन दिला होता. त्यानंतर एकच चर्चा रंगली होती.

कालांतराने महेश भट्ट यांच्या चित्रपटांनी तर यात आणखीनच भर घालत मर्डर सारख्या चित्रपटांनी बोल्डनेसच्या सार्‍या मर्यादाच तोडल्या. आता मराठी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेत्री चर्चेत आलेली आहे. कारण या अभिनेत्रीने आपल्या पहिला किसिंग सीनचा अनुभव चाहत्यांची शेअर केला आहे. याबद्दल तिने अनेक दिलखुलास उत्तरे देखील दिली आहेत.

या अभिनेत्रीचे नाव गिरीजा ओक गोडबोले असे आहे. गिरीजा ओक गोडबोले हिने अनेक मालिका आणि चित्रपटात देखील काम केले आहे. गिरिजा ओक ही मूळची नागपूरची असून ती आता सध्या 34 वर्षांची आहे. गिरजाच्या वडीलांना सगळे जण ओळखतात. गिरीजाचे वडील डॉक्टर गिरीश ओक हे देखील दिग्गज अभिनेते आहेत.

गिरीजा हिने काही वर्षांपूर्वी शरद गोडबोले यांच्या सोबत लग्न केले आहे. या दोघांना एक आपत्य देखील आहे. गिरजा हिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यामुळे तिने कॉलेज जीवनामध्ये अनेक जाहिराती आणि मॉडेलिंग मध्ये देखील काम केले. त्यानंतर तिने आपला मोर्चा नाटकांकडे वळवला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. काही वर्षांपूर्वी तारे जमीपर हा चित्रपट आला होता.

या चित्रपटामध्ये आमिर खानची मुख्य भूमिका होती. लहान मुलांवर आधारित या चित्रपटामध्ये डॉ. गिरीजा हिने देखील अतिशय जबरदस्त काम केले होते. तिची या चित्रपटात छोटीशी भूमिका होती. मात्र, ती सगळ्यांच्या लक्षात राहिली. अलीकडे आलेल्या अल्ट बालाजीच्या कार्टेल या वेब सिरीज मध्ये काम केले.

गिरिजा ओक हिने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. त्या मुलाखतीमध्ये तिने आपल्या पहिल्या किसिंग सीन बद्दल माहिती दिली आहे. पहिला किसिंग सीन करताना मला विचित्र वाटले होते, असे तिने म्हटले आहे. द शोर ऑफ सिटी या चित्रपटासाठी तिने किस दिला होता. ज्या वेळेस मी पहिला किसिंग सीन केला त्यावेळेस मी कॉलेजमध्ये होते. त्यामुळे मला फारसे आठवत नाही.

मात्र, हे फार विचित्र होते. पहिला किसिंग सीन करताना शेजारी पाऊस पडणे आणि रोमँटिक मूड असणे फार गरजेचे असते. मात्र, नंतर मला पहिला किसिंग सीन चे महत्व पटले आहे. त्यामुळे माझ्या पद्धतीने तो किसिंग व्हायला हवा होता. मात्र, असे झाले नाही, असेही तिने सांगितले. तिच्या या वक्तव्यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

Team Beauty Of Maharashtra