खडीसाखरेचे हे उपाय देखील आहेत खूप गुणकारी, आर्थिक संकटावर होईल मात आणि…

भगवान श्रीकृष्णाला खडीसाखर फार आवडते, म्हणून त्याचा वापर तुमच्या सर्वांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. ज्योतिष शास्त्रात खडीसाखरेचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे असे मानले जाते. असं म्हणतात की दिवसातून एकदा देवाला खडीसाखरेचा प्रसाद दिला पाहिजे. यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होते तसेच त्यामुळे शरीराला ताकद आणि शक्ती मिळते. आज खडीसाखरे संबंधित उपाय आणि फायद्यांविषयी जाणून घेऊयात..
लक्ष्मी देवीला खडीसाखरेचा प्रसाद- धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीला मिश्री खूप प्रिय आहे. देवीला नियमित खडीसाखरेचा प्रसाद अर्पण केल्याने कुटुंबातील लोकांमध्ये बोलण्यात गोडवा येतो आणि प्रभाव वाढतो. असे मानले जाते की खडीसाखरेच्या वापरामुळे शुक्रची स्थिती सुधारते.
खडीसाखरेचा उपाय- खडीसाखर गव्हाच्या पिठात एकत्र करून शनिवारी जिथे काळ्या मुंग्या आहेत तिथे ठेवावी. शनीचा प्रतिकूल प्रभाव नाहीसा होईल. वैवाहिक जीवनात अनुकूल परिणाम देखील मिळेल. आर्थिक बाजू चांगली आणि फायदेशीर होऊ लागते. यांचा प्रतिकूल प्रभाव संपल्यानंतर तुमच्या घरात सुख आणि समृद्धी नांदते. तुमची बिघडलेली कामे मार्गी लागतात. हा उपाय शनिवारी केल्यास शुभ मानला जातो.
राहूचा प्रतिकूल परिणाम दूर होतो- खडीसाखरेमध्ये बडीशेप मिसळून खाल्ल्याने राहूचा प्रतिकूल प्रभाव दूर होतो. पचनशक्ती बळकट होते. बुध ग्रहाची स्थिती देखील सुधारते. यामुळे सकारात्मक विचार आणि बौद्धिक क्षमता वाढते. जर मुलांना रोज बडीशेप आणि खडीसाखर दिली तर त्यांची स्मरणशक्ती मजबूत होते आणि वाचनात एकाग्रता वाढते.
नोकरी मिळवण्यासाठी- बराच वेळ प्रयत्न करूनही जर तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर बुधवारी थोडा कापूर आणि खडीसाखर घ्या आणि दोन्ही गोष्टी एकत्र दान करा. यासह, थोडा कापूर जाळून त्यावर थोडी खडीसाखर घाला. असे केल्याने तुम्हाला लवकरच नोकरी मिळण्यात यश मिळू शकते.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.