कतरिना कैफला विकी कौशलसोबत लग्न करण्याचा निर्णय पडला महागात ?

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या अभिनेता विकी कौशल सोबतच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. मात्र, दरम्यान, सुपरस्टार सलमान खान तिच्यापासून दुरावल्याची बातमी समोर येत आहे. खरंतर, सलमान खान दरवर्षी द-बँग टूरच्या नावाने लाइव्ह कॉन्सर्ट आयोजित करतो.
ज्यामध्ये त्याच्यासोबत अनेक लोकप्रिय सेलेब्स देखील सहभागी होताना दिसतात.या दौऱ्यादरम्यान, सगळे सेलिब्रिटी लाइव्ह परफॉर्मन्स देतात. ज्याची चाहत्यांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून हा कार्यक्रम झाला नव्हता. आता कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट होत असताना पुन्हा एकदा जनजीवन पूर्वपदावर येत आहे.
अशा परिस्थितीत सलमान खानने त्याच्या चाहत्यांना एक आश्चर्यकारक सरप्राईज दिलं आहे.सलमान खानने अलीकडेच घोषणा केली आहे की, यावर्षी 10 डिसेंबर रोजी द-बँग टूर होणार आहे. सौदी अरेबियातील रियाध शहरात हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. ज्यामध्ये अनेक प्रसिद्ध स्टार्स दिसणार आहेत.
या कार्यक्रमाची माहिती देताना, सलमान खानने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये अनेक स्टार्स दिसत आहेत.ज्यामध्ये सुनील ग्रोव्हर, सलमान खान, जॅकलीन फर्नांडीज, गुरु रंधावा, शिल्पा शेट्टी आणि आयुष शर्मा यांसारख्या स्टार्सचा समावेश आहे. हे सगळे कलाकार प्रेक्षकांमध्ये लाईव्ह परफॉर्मन्स देणार आहेत.
अशा परिस्थितीत सलमान खानच्या चाहत्यांना या कार्यक्रमाची प्रचंड उत्सुकता दिसत आहे.काही चाहते थोडे निराश दिसत आहेत. याचं कारण म्हणजे गेल्या वेळेप्रमाणे यावेळीही कतरिना कैफ या कार्यक्रमाचा भाग नाही कारण सलमान खानने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये कतरिना कैफचा फोटो नाही.
याचा अर्थ कतरिना या कार्यक्रमाचा भाग असणार नाही.यामुळे चाहते खूपच निराश दिसत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विकी कौशल आणि कतरिना कैफ ७ ते ९ डिसेंबर दरम्यान लग्नबंधनात अडकणार आहेत. आता या कार्यक्रमाची तारीखही समोर आली आहे, त्यामुळे सलमान खान विकी आणि कॅटच्या लग्नाला उपस्थित राहणार नसल्याची शक्यता वर्तवली जातेय.