करिना कपूरचं हे काय झालं! वाढलेल्या पोटाकडे गेलं साऱ्यांचं लक्ष, युझर्स म्हणाले..

करिना कपूरचं हे काय झालं! वाढलेल्या पोटाकडे गेलं साऱ्यांचं लक्ष, युझर्स म्हणाले..

करीना कपूर ही बॉलिवूडमधली एकमेव अशी अभिनेत्री आहे की, ती कायमच चर्चेत असते. सोशल मीडियावर ती आपल्या चाहत्यांशी कायम संपर्कात असते. त्याचप्रमाणे आपल्या मुलांचे फोटो देखील नेहमी शेअर करत असते.

करिना कपूर हिने जे.पी. दत्ता यांच्या रेफ्युजी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. रेफ्युजी चित्रपट हा बॉक्स ऑफिसवर आपटला. मात्र करीना कपूर हिची चर्चा मात्र मोठ्या प्रमाणात झाली. या चित्रपटात तिच्यासोबत अभिषेक बच्चन हा देखील होता.

मात्र, अभिषेक बच्चन याला या चित्रपटात कोणीही विचारले नाही. त्यानंतर करीना कपूर हिने मागे वळून पाहिलेच नाही. त्यानंतर करीना कपूर हिने रितिक रोशन, शाहरुख खान यांच्यासह बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले. शाहिद कपूर याच्या सोबत आलेला तिचा जब वी मेट हा चित्रपट प्रचंड गाजला होता.

या चित्रपटाने तिला बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवून दिले. या चित्रपटात तिने शाहिद कपूर सोबत किसिंग सीन केला होता. हा सीन प्रचंड गाजला होता. यानंतर हे दोघे प्रेम प्रकरणात असल्याचे सांगण्यात येत होते. हे दोघेही आता लग्न करणार आहेत, असेही सांगण्यात येत होते. मात्र, कालांतराने करीना कपूर हिने शाहिद कपूर याची साथ सोडली.

त्यानंतर करिना कपूर हिने दोन मुलांचा बाप असलेल्या सैफ अली खान सोबत लग्न केले. सैफ अली खान याचे पहिले लग्न अमृता सिंह हिच्या सोबत झाले असून अमृता सिंह यांना सारा अली खान आणि इब्राहिम ही मुले आहेत. सारा अली खान देखील बॉलिवूडमध्ये चांगलीच रुळली आहे, असे असले तरी करीनाने सैफ सोबत लग्न केले.

सैफ सोबत लग्न केल्यानंतर करीना कपूर हिला दोन मुले झाली आहेत. एकाचे नाव तैमूर आहे तर दुसऱ्याचे नाव जहॉगीर असे आहे. करीना कपूर ही सोशल मीडियावर देखील खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. करिना कपूर हिचा नुकताच एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ती एका हॉटेलमधून बाहेर पडताना दिसत आहे. हॉटेलमधून बाहेर पडताना अनेक फोटोग्राफरने तिचे फोटो काढले.

या फोटोमध्ये तिचे पोट सुटलेले दिसत आहे. त्यामुळे तिला चहात्यांनी ट्रोल केले आहे. सोशल मीडियावर अनेकांनी या फोटो वर कमेंट टाकलेल्या आहेत. एकाने म्हटले आहे की, बेबोला पुन्हा फिटनेस गोल करण्याची गरज आहे. तुझं वजन खूप वाढले आहे, तर दुसऱ्याने लिहिले आहे की, मला आश्चर्य वाटते की, त्या तैमूरच्या जन्मानंतर करीनाने स्वतःला मेंटेन ठेवले होते.

मात्र, आता ती फुटबॉल सारखी झाली आहे. करीना कपूर ही या फोटोमध्ये चांगलीच जाड झाली आहे. मात्र, करीना कपूर हिला गेल्या वर्षी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे तिने फिटनेस सोडून आपल्या आहारावर लक्ष दिले होते. त्यामुळे तिने प्रचंड आहार आणि पौष्टीक आहार घेतला. त्यामुळे तिची प्रकृती पुन्हा वाढली आहे.

आता ती पुन्हा एकदा झिरो फिगर करेल, असा विश्वास तिच्या चाहत्यांना आहे.

Team Beauty Of Maharashtra