Video ! करीनाचे बॉडिगार्ड सोबत असले कृत्य चाहते म्हणाले, ‘घमंडी आंटी’

Video ! करीनाचे बॉडिगार्ड सोबत असले कृत्य चाहते म्हणाले, ‘घमंडी आंटी’

अभिनेत्री करीना कपूर खान सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. करीना चाहत्यांच्या संपर्कात रहाण्यासाठी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. शिवाय तिचे काही व्हिडिओ अन्य अकाउंटच्या माध्यमातून पोस्ट करत असतात.

पण यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. आता देखील करीनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामुळे करीना चाहत्यांच्या निशाण्यावर आली आहे.

व्हिडिओमध्ये करीना घरातून बाहेर येत. तेव्हा कारच्या दिशेने जात असताना. रस्त्यात उभा असलेला गार्ड तिला सैल्यूट करतो. तेव्हा करीना गार्डकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते. गार्डप्रती तिची अशी वागणूक पाहिल्यानंतर सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं जात आहे. चाहत्यांनी करीनाने गार्डसोबत केलेला असा व्यवहार कोणालाही आवडलेला नाही.

व्हिडिओ अनेकांच्या नकारात्मक कमेन्ट येत आहेत. एक युझर म्हणतो, ‘करीनाचा ऍटीट्यूड तर पाहा…’ तर दुसऱ्या युझरने करिनाला ‘घमंडी आंटी’ म्हणून हाक मारली आहे. करीनाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Team Beauty Of Maharastra