करण जोहरवर संतापले नयनताराचे फॅन्स, नेमकी काय आहे भानगड

करण जोहरवर संतापले नयनताराचे फॅन्स, नेमकी काय आहे भानगड

करण जोहरचा कॉफी विथ करण 7’ हा शो नेहमीप्रमाणे चांगलाच चर्चेत आहेत. नुकतंच ‘कॉफी विथ करण 7’च्या एका एपिसोडमध्ये अक्षय कुमार व साऊथ स्टार सामंथा रूथ प्रभु हे दोघे गेस्ट म्हणून सहभागी झालेत. यावेळी करणने सामंथाला अनेक प्रश्न केलेत. बऱ्याच गप्पागोष्टी रंगल्या. पण याचदरम्यान करण असं काही बोलून गेला की, साऊथ सुपरस्टार नयनताराचे फॅन्स नाराज झालेत. मग काय करण जोहर प्रचंड ट्रोल झाला.

‘कॉफी विथ करण 7’च्या दुसऱ्या एपिसोडनंतरही करण जोहर असाच ट्रोल झाला होता. सारा अली खान व जान्हवी कपूर यांच्या दुजाभाव केल्याचा आरोप त्याच्यावर चाहत्यांनी केला होता आणि यामुळे करण ट्रोल झाला होता. आता नयनताराबद्दल केलेल्या कमेंटमुळे करण ट्रोल होतोय.

‘कॉफी विथ करण 7’च्या रॅपिड फायर राऊंडमध्ये करणने सामंथा रूथ प्रभुला साऊथच्या सर्वात मोठ्या फिमेल सुपरस्टारबद्दल विचारलं. तुझ्या मते, सध्या साऊथमध्ये सर्वात मोठी फिमेल स्टार कोण आहे? असा प्रश्न त्याने केला. यावर मी नुकताच नयनतारासोबत एक सिनेमा केला आहे, जी साऊथची सर्वात मोठी स्टार आहे, असं सामंथा म्हणाली.

यावर, ‘अच्छा, माझ्या लिस्टमध्ये तर ती नाहीये,’असं करण म्हणाला. (करणने यावेळी ओरमॅक्स मीडियाने जारी केलेल्या देशातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीचा उल्लेख केला. या यादीत सामंथा नंबर 1 वर आहे.)

Team Beauty Of Maharashtra