सिनेइंडस्ट्रीत काम मिळवण्यासाठी तुम्हाला कुणाच्यातरी पाठीमागं…, मराठमोळ्या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

चित्रपट सृष्टीमध्ये काम मिळवण्यासाठी अनेक कलाकार हे नेहमीच सक्रिय असतात. चित्रपटात काम करण्यासाठी अनेक कलाकारांना मोठी मेहनत घ्यावी लागते. मग हो यासाठी हे अभिनेता व अभिनेत्री वेगवेगळे मार्ग पत्करत असतात.
अनेक अभिनेत्रींना कास्टिंग काउच सारख्या प्रकाराला देखील सामोरे जावे लागले आहे. याबाबत अनेकांनी खुलासा देखील केला आहे. मध्ये काही वर्षांपूर्वी मी टू नावाची चळवळच देखील उभी राहिली होती. चळवळी अंतर्गत अनेक अभिनेत्रींनी आपल्यावर झालेल्या अत्याचारांच्या पाढा वाचला होता.
यामध्ये ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना देखील धारेवर धरण्यात आले होते, तर ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ कास्टिंग काउच वरून ट्रोल झाले होते. मराठी चित्रपटात आघाडीच्या अभिनेत्रींनी हिंदी चित्रपटसृष्टी मध्ये काम मिळवण्यासाठी कशाप्रकारे वागावे लागते किंवा तुम्हाला काय गमवावे लागते ते सांगितले आहे.
त्याचप्रमाणे तुम्हाला या क्षेत्रात राहण्यासाठी नेमकं काय काम करावे लागते, हे देखील तिने सांगितले आहे. या अभिनेत्रीबद्दलच आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत. या अभिनेत्रीचे नाव मीनल बाळ असे आहे. मीनल हिने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये तिने आपल्याला आलेले अनुभवबाबत माहिती दिली आहे.
यामध्ये ती म्हणते की बॉलीवूडमध्ये तुम्हाला गॉडफादर नसतील तर तुम्हाला काही गोष्टी कराव्याच लागतील. त्या शिवाय तुम्हाला पुढे जाता येणे शक्यच नाही, असे तिने म्हटले आहे. तिने यामुळे सांगितले आहे की, तुम्ही खूप कष्ट घेऊन काम करतात. धडपड, संयम श्रद्धा यामुळे तुम्हाला फळ वगैरे मिळते, हे काही खरे नसते.
तुम्हाला कुणाच्यातरी पाठीमागं जावं लागतं. चांगल्या लोकांच्या संपर्कात तुम्हाला राहावे लागते. एक ग्रुप तयार करून त्यांच्या सोबत तुम्हाला राहावे लागते. त्याचबरोबर तुम्हाला त्यांची तारीफ करावी लागते. एखाद्याला खोटं खोटं देखील सांगावं लागतं. तुम्ही वरवर काम केले तरी मग चालेल. तुम्हाला तर काम हे सातत्याने भेटत जाणार.
तुम्हाला मग लोक डोक्यावर घेतील. हा मराठी चित्रपट सृष्टी मध्ये किंवा बॉलिवूडमध्ये यशस्वी होण्याचा मार्ग आहे. तिने एक हिंदीमधील कॅप्शन देखील दिली आहे. रामचंद्र कह गये सिया से, ऐसा कलयुग आयेगा हंस चुगेगा दाना का मोती खायेगा अशी कॅप्शन देत सर्वांना सांगितले आहे. कोणीही हे वैयक्तिक घेऊ नये.
मी फक्त उपदेश केला आहे, असे तिने सांगितले आहे. मीनलने केलेल्या पोस्टवर अनेकांनी आपले मत व्यक्त केले आहे. तसेच अनेकांनी तिला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे मीनलने केलेल्या पोस्टवर आपले काय म्हणणे आहेz ते आम्हाला नक्की