शास्त्रामध्ये फार महत्व असलेल्या काळ्या धाग्याचे आहेत अनेक फायदे..

शास्त्रामध्ये फार महत्व असलेल्या काळ्या धाग्याचे आहेत अनेक फायदे..

काळा धागा हा खूपच चमत्कारी असतो आणि आपण ह्या काळ्या धाग्याच्या मदतीने अनेक प्रकारच्या अडचणी दूर करू शकतो. काळया धाग्याच्या संबंधित काही खास फायदे आम्ही तुम्हाला या लेखात सांगणार आहोत आणि काळया धाग्याच्या मदतीने आपण जीवनाच्या अनेक त्रासांपासून मुक्त होऊ शकतो.

काळया धाग्याच्या मदतीने आपण वाईट नजरेपासून वाचू शकतो आणि वाईट नजरेला आपण आपल्या पासून दूर ठेऊ शकतो. असे मानले जाते की, जे लोक काळया रंगाचे धागे वापरतात त्या लोकांना वाईट नजर लागत नाही.

म्हणून ज्या लोकांना प्रत्येक वेळेस वाईट नजर लागते त्या लोकांनी काळया रंगाच्या धाग्याचा उपयोग करावा. तुम्ही या धाग्याला गळ्यात, हातात किंवा पायात घालू शकता. ह्या धाग्याला घातल्याने वाईट नजर लागत नाही.

शास्त्रानुसार काळया रंगाचा धागा हा वाईट नजरेला स्वतः च्या आत घेतो व त्याचा प्रभाव कमी करून टाकतो. सोबतच हा एक संरक्षक ढाल म्हणून सुद्धा काम करतो.

शनी देवा पासून स्वतःला वाचवा- शनी देवाला काळा रंग हा अत्यंत प्रिय आहे आणि ह्या रंगाचा धागा वापरल्याने शनीचा दोष दूर होऊ शकतो. ज्या लोकांच्या कुंडलीत शनी दोष आहे त्या लोकांनी आपल्या हातात काळया रंगाचा धागा बांधून घ्यावा. असे केल्याने शनी चा दोष दूर होऊन जाईल.

होताल श्रीमंत- काळ्या रंगाच्या धाग्याला जर पर्स मध्ये ठेवले, तर पर्स ही नेहमी पैशांनी भरलेली राहील. म्हणून तुम्ही तुमच्या पर्स मध्ये नेहमी एक काळया रंगाचा धागा ठेवत जा. हे ठेवल्यास तुमची पर्स कधीही खाली होणार नाही आणि नेहमी पैशांनी भरलेली राहील.

घरापासून दूर जाईल नकारात्मक ऊर्जा मंगळवारी हनुमानजींच्या मंदिरात जावे आणि आपल्यासोबत काळया रंगाचा धागा सोबत घेऊन जावा. हनुमानांची पूजा करावी व त्यानंतर धाग्याला नऊ छोटी – छोटी गाठबांधून घ्यावी.

गाठ बांधल्या नंतर हनुमानजींच्या पायाचे शेंदूर त्या धाग्याला लावावे. त्यानंतर ह्या धाग्याला घराच्या मुख्य दरवाजाला बांधून द्यावे. हा उपाय केल्यास घरापासून नकारात्मक ऊर्जा दूर जाईल.

जादू टोण्यापासून होईल बचाव- काळा धागा बांधनाऱ्या लोकांची रक्षा जादू टोण्या पासून पण होते. जर तुमच्यावर कोणी जादुटोणा करत असेल तर तुम्ही काळया रंगाचा धागा बांधून घ्यावा. ह्या धाग्याला हातात किंवा गळ्यात बांधल्याने जादुटोण्याचा तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही.

वाईट स्वप्नांन पासून वाचा- मंगळवारी मंदिरात जाऊन हनुमानजींची पूजा करावी. पूजा करताना हनुमानजींच्या पायाशी काळ्या रंगाचा धागा ठेऊन द्यावा. ह्या धाग्याला घरी घेऊन जावे व आपल्या पलंगाखाली ठेऊन द्यावे. असे केल्यास तुम्हाला वाईट स्वप्ने येणे बंद होईल.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Beauty Of Maharashtra