लग्नाला झाला एक महिना! जुईलीनं शेअर केला नवरा रोहितसोबतचा बेडरूम Video

लग्नाला झाला एक महिना! जुईलीनं शेअर केला नवरा रोहितसोबतचा बेडरूम Video

रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांचा 23 जानेवारी रोजी विवाह थाटामाटात संपन्न झाला. पुण्यातील ढेपे वाड्यात या दोघांचा पारंपारिक पद्धतीने विवाह सोहळा संपन्न झाला.

विवाह सोहळ्यास मोजकीच लोकांची उपस्थिती होती व रोहित या दोघांची पहिली भेट सा रे ग म प लिटील चॅम्प्स मंचावर झाली. यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली‌. हळूहळू डेटिंग सुरू झाले आणि थेट लग्नापर्यंत ही मैत्री येऊन पोहोचली. रोहित व या दोघांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे

जुईली ही नव्या पिढीतील गायिका आहे. सोशल मीडियावर तिचा चहाता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. जुईलीचे यूट्यूब चैनल देखील आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. रोहितचा देखील सोशल मीडियावर चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. चहाता वर्गांमध्ये तरुणींचा उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल.

तरुणींना रोहितची क्रेझ खूप आहे. रोहित देखील सोशल मीडियावर सक्रिय असतो. जुईली ही सोशल मीडियावर नेहमी फोटो शेअर करत असते. रोहित व जुईली या दोघांना मराठी संगीत क्षेत्रातील कुलेस्ट कपल म्हणून ओळखले जातात. रोहिता आणि जुईली यांच्या लग्नाल एक महिना आज पूर्ण झाला आहे.

यानिमित्त पत्नी जुईलीने रोहितचा एक बेडरूम व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सकाळचा आहे. जुईली रोहितला उठवायचा प्रयत्न करत आहे. यावर रोहित म्हणत आहे की, फक्त दोन मिनिट..आणि नंतर त परत झोपताना दिसत आहे. जुईलीने म्हटलं आहे की, Yep! 1 month! #1monthanniversary.एक महिना झाला आहे असं तिनं म्हटलं आहे.

जुईलीच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे. एकाने म्हटलं आहे की, रोहित दादा ऊठ नाहीतर काठीने मारून काढेल जुईली ताई..तर दुसऱ्याने म्हटलं आहे की, पाणी टाक थंड… काही चाहत्यांनी त्याला झोपू दे थोडावेळ असं देखील म्हटलं आहे.

रोहित व जुईली या दोघांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याबद्दल अनेकांनी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. रोहित राऊत याने इंडियन आयडल या शोमध्ये आपल्या आवाजाची जादू सुरुवातीला दाखवली होती. या शोमध्ये त्याने सगळ्यात आधी दिलसे रे हे गाणे म्हटले होते. त्याचे हे गाणे अतिशय हीट असे ठरले होते.

त्याच्या या गाण्याला प्रेक्षकांची देखील चांगली पसंती मिळाली होती. आता या दोघांची जोडी देखील प्रेक्षकांना खूप आवडत आहे.

Team Beauty Of Maharashtra