जोडीदाराचं प्रेम कायम तुमच्यावर राहील, करा ‘हे’ खास उपाय

जोडीदाराचं प्रेम कायम तुमच्यावर राहील, करा ‘हे’ खास उपाय

स्त्रिया अनेकदा तक्रार करतात की त्यांचे पती त्यांचे ऐकत नाहीत. ते त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. तुम्हालाही तुमच्या पतीकडून अशाच तक्रारी असतील तर आता काळजी करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला ज्योतिषशास्त्राचे असे उपाय सांगत आहोत, ज्याद्वारे तुमच्या सर्व समस्या दूर होतील आणि तुमचा पती तुमचे आज्ञाधारक होऊ लागतील आणि तुमच्यावरचं प्रेम कायम राहील. चला जाणून घेऊया कोणते आहेत हे उपाय…

शिव पार्वती आणि कात्यायनी देवीची पूजा- असे म्हणतात की, भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतात. यासोबतच महिला आणि अविवाहित मुलींनी रोज कात्यायनी देवीची पूजा करावी. असे केल्याने तुमच्या नवऱ्याचे तुमच्यावरचे प्रेम कायम वाढत राहील, आणि या उपायामुळे अविवाहित मुलींना योग्य वर मिळतो.

शुक्राच्या मंत्रानेही लाभ होईल- ज्योतिषशास्त्रात शुक्र हा प्रेम, सौंदर्य आणि आकर्षणाचा कारक मानला जातो. म्हणजेच शुक्राचा शुभ प्रभाव असेल तर तुमच्या जीवनात प्रेम, सौंदर्य आणि आकर्षणाची कमतरता नसते आणि सुखी वैवाहिक जीवन जगण्यासाठी या तिन्ही गोष्टी असणे अत्यंत आवश्यक मानले जाते. शुक्राचा शुभ प्रभाव मिळविण्यासाठी महिलांनी दररोज शुक्राच्या बीज मंत्राचा जप करावा. हा मंत्र खालीलप्रमाणे आहे. ‘ऊॅं द्रम द्रीम द्रुम सह शुक्राय नमः’

गरीब मुलीच्या लग्नात दान करा- असे म्हटले जाते की, एखाद्या व्यक्तीने आपल्या उत्पन्नाचा काही भाग दान केला पाहिजे. यामुळे त्याच्या समाजाला तर हातभार लागतोच, शिवाय त्याच्या अशुभ ग्रहांचा प्रभावही दूर होतो. गरीब मुलीच्या लग्नात दान केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनातील अशुभ ग्रहांचा प्रभाव नाहीसा होतो. त्यामुळे गरीब मुलीच्या लग्नात काही हातभार लावा.

देवीला गोड पान- असे म्हणतात की लक्ष्मी देवीला गोड पान अर्पण केल्याने देखील वैवाहिक जीवनात प्रेम आपुलकी वाढते आणि पती आपल्या जोडीदाराच्या बोलण्याकडे लक्ष देतो. जर तुम्हाला रोज अर्पण करता येत नसेल तर, किमान दर शुक्रवारी लक्ष्मी देवीला गोड पान अर्पण करावे. याशिवाय लक्ष्मी मातेला अत्तर अर्पण केल्याने पतीसोबतचे नाते सुधारते.

अंध व्यक्तीला देणगी- डोळ्यांनी बघू न शकणारी एखादी व्यक्ती तुमच्या समोर आली तर त्याला शक्य तितकी मदत करा. अशा व्यक्तीला मदत करणे हे देखील एक पुण्य मानले जाते. ज्याला डोळ्यांनी बघता येत नाही, त्यांचा हात धरून त्यांना रस्ता ओलांडायला मदत करायला हवी.

श्रीयंत्राची पूजा- रोज सकाळी आंघोळ करून देवाचे दर्शन घेतल्यानंतर श्री यंत्राची पूजा अवश्य करावी. असे म्हटले जाते की, दररोज श्री यंत्राची पूजा केल्याने तुमच्या घरात सुख-समृद्धी येते आणि तुमचा पतीही तुमच्यावर खूप खुश असतो.

कन्यांना खीर खाऊ घाला- कुमारीकांसाठी आठवड्यातून एक दिवस तरी निश्चित करा. या दिवशी कुवारीका बोलावून त्यांना खीर किंवा इतर गोड पदार्थ खाऊ घाला. हे काम गुरुवारी किंवा शुक्रवारी करणे सर्वात शुभ असते. असे म्हटले जाते की, कुमारीका जेवू घातल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि तुमचे वैवाहिक जीवन आनंदी होते.

शुक्रवारी घरात गुलाब आणा- शुक्रवार देवी लक्ष्मीला समर्पित आहे आणि हा दिवस लक्ष्मी मातेसह पत्नीला प्रसन्न करण्यासाठी सर्वात योग्य आहे. शुक्रवारी लक्ष्मी देवीच्या चरणी गुलाब अर्पण करा आणि पत्नीसाठी तिची आवडती मिठाई घेऊन घरी जा.

लवंग आणि कापूरचा धूर- तुमच्या घरातील वातावरण प्रसन्न व्हावे आणि प्रेमाचा सुगंध कायम दरवळत राहावा असे वाटत असेल तर रोज सकाळी आणि संध्याकाळी घरात लवंग आणि कापूर जाळावा. यामुळे घर सुगंधित होईलच पण तुमच्या घरातून सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होईल. रोज नाही तर दर शुक्रवारी हे काम नक्की करा.

Team Beauty Of Maharashtra