‘जीव माझा गुंतला’ मधील ‘मल्हार’ सोबत घडला विचित्र प्रसंग, जाणून घ्या नेमकं काय घडलंय

जीव माझा गुंतला ही मालिका सध्या प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेमध्ये मल्हार आणि अंतरा ही जोडी प्रेक्षकांना खूपच आवडतात दिसत आहे. या मालिकेमध्ये सौरभ चौगुले याने मल्हार ही भूमिका अतिशय व्यवस्थित प्रकारे साकारलेली आहे
मालिकेत मल्हार खानविलकर ही भूमिका अतिशय उत्कृष्टरित्या साकारताना दिसतो. मालिकेत सध्या श्वेता ही मल्हारची पत्नी होण्याचे स्वप्न बघत असते. त्याच्या केबिनमध्ये बसून मी आता लवकरच मल्हार ची पत्नी होणार. श्वेता मल्हार खानविलकर होणार, कोट्याधीश नवऱ्याची बायको असे म्हणताना ती दिसत आहे.
तर तिकडे चित्रा सगळे लपून हे ऐकत असते. त्यानंतर तिची पोल-खोल होते. तर या मालिकेमध्ये आता नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. नुकत्याच होणाऱ्या भागांमध्ये आता अंतरही महाविद्यालय जाते. तिथे महाविद्यालयांमध्ये तिच्यामागे काही गुंड लागतात. त्या गुंडांचा ती प्रतिकार देखील करते.
मात्र महाविद्यालयाच्या आवारात गुंड येतात. त्यामुळे मोठा गदारोळ येथे होतो. त्यावर महाविद्यालयाचे प्राचार्य अंतरा हिला म्हणतात की, जोपर्यंत खानविलकर मॅडम यांचा माफीनामा आणत नाही किंवा त्यांच्याशी बोलणे करून घेत नाही, तोपर्यंत तुला आम्ही कॉलेजमध्ये घेणार नाही. तोपर्यंत तुझ्यासाठी कॉलेजचे गेट बंद राहतील.
मात्र तिकडे दुसरीकडे अंतरा ही अस्वस्थ होते आणि कॉलेजच्या बाहेर येऊन एकटीच बसते आणि ठोंबरे ला फोन लावते. ठोंबरे देखील फोन उचलत नाही. त्यामुळे आता अंतरा च्या पाठीमागे कोण गुंड लावलेले आहेत, हे काही कळत नाही.
त्यामुळे अंतरा ही खूप त्रस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे अंतरा आणि मल्हार यांच्यामध्ये अजिबात जमत नसल्याचे देखील चित्र आहे. मात्र, या दोघांनी आता जमवून घ्यावे, असे देखील अनेकांना वाटते. मात्र, ते सध्या तरी शक्य दिसत नाही. तिकडे श्वेता ही मल्हार ची बायको होण्याचा प्रयत्न करत आहे.
मात्र, तिचा डाव यशस्वी होईल की नाही, हे देखील आता सांगता येत नाही. या मालिकेत काम करणारा मल्हार म्हणजे अभिनेता सौरभ चौगुले याने नक्कीच एक सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने एका कंपनीकडे तक्रार केली आहे. तो एका ठिकाणी जात असताना त्याची एमजी महागडी कार रस्त्यातच बंद पडली.
त्यामुळे तो खूप वैतागला होता. त्यानंतर त्याने कंपनीच्या कस्टमर केअरला फोन केला. मात्र ते चार ते पाच तास तिथे आलेच नाहीत. त्यावर सौरभ याने सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर सौरभ म्हणतो की, नियमाप्रमाणे कंपनीने माझी गाडी टो करून न्यायला हवी होती. त्याचप्रमाणे मला देखील कॅब बुक करून द्यायला हवी होती.
मात्र, कंपनीने असे काहीही केले नाही. कॅबसाठी मला पाच तास वाट पाहावी लागली, तर ही पोस्ट शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्या समर्थनार्थ अनेक चाहते आले आणि त्यांनी कंपनीला चांगेलच सुनावले.