‘जीव माझा गुंतला’ मालिकेतील ‘ही’ अभिनेत्री पडली प्रेमात, प्रियकरही आहे अभिनेता

जीव माझा गुंतला ही मालिका गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांची चांगले मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेमध्ये सगळ्याच भूमिका प्रेक्षकांना खूप आवडतात. अंतराची भूमिकादेखील प्रेक्षकांना खूप आवडते. प्रतीक्षा मुणगेकरची भूमिकाही या मालिकेत चांगली झाली आहे.
त्याचबरोबर या मालिकेमध्ये मल्हार याची भूमिका देखील लोकप्रिय झाली आहे. अभिनेता सौरभ चौगुले यानेही मालिकेत जबरदस्त रित्या भूमिका साकारली आहे. मालिकेत त्याने मल्हार खानविलकर हे पात्र अतिशय योग्य प्रकारे साकारले आहे. या मालिकेमध्ये त्याची भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली आहे.
काही दिवसांपूर्वी या मालिकेत काम करणारी प्रतिक्षा मुणगेकर हिच्यावर देखील एक प्रसंग ओढवला होता. तिचे सगळे सोशल मीडियावर चे मित्र गायब झाले होते. याचे कारण म्हणजे तिचे सोशल मीडिया अकाउंट कोणीतरी हॅक केले होते. या मालिकेमध्ये पूर्वा शिंदे अतिशय चांगल्या प्रकारे काम करताना दिसत आहे.
तिची श्वेता ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडत आहे. पूर्वा शिंदेही सोशल मीडिया खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर ती फोटो देखील शेअर करत असते. तिच्या फोटोला अनेक चाहते देखील लाईक करत असतात. आता श्वेता हिचे पूर्वा शिंदेच्या बाबतीत एक बातमी समोर आली आहे. अनेक चाहत्यांनी या वर कमेंट देखील केलेल्या आहेत.
जीव माझा गुंतला या मालिकेतील श्वेता म्हणजेच अभिनेत्री पूर्वा शिंदे या मालिकेत मल्हार याच्या एकतर्फी प्रेमात असल्याचा दाखवले आहे. अभिनेत्री पूर्वाच्या रियल लाईफ बॉयफ्रेंड हादेखील अभिनेता आहे. लागीर झालं जी मालिकेतील विक्या म्हणजेच अभिनेता निखिल चव्हाण हा तिचा बॉयफ्रेंड आहे.
लागिर झालं जी ही पूर्वा हिची पहिलीच मालिका होती. याच मालिकेत अभिनेता निखिल चव्हाण हा अजिंक्य याच्या मित्राची भूमिका साकारत होता. त्यामुळे या मालिकेच्या सेटवर त्यांच्यात जवळीक वाढली आणि ते प्रेमात पडले, असं म्हटलं जातं. पूर्वा आणि निखिल खूप सारे फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर करत असतात.
त्यामुळे चाहत्यांनी ते प्रेमात असल्याचा अंदाज लावला आहे, तर तुम्हाला जीव माझा गुंतला मालिकेतील अभिनेत्री पूर्वा शिंदेचा अभिनय आवडतो का. पूर्वा आणि निखिल यांची जोडी तुम्हाला कशी वाटते आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा.