मराठी सृष्टीतल्या या प्रसिद्ध जेष्ठ कलाकारांचे खरे वय जाणून घ्या !

मराठी सृष्टीतल्या या प्रसिद्ध जेष्ठ कलाकारांचे खरे वय जाणून घ्या !

मराठी चित्रपट सृष्टी मध्ये असे अनेक अभिनेते व अभिनेत्री आहेत की, ज्यांचे वय हे किती आहे हे जाणून घ्यायची इच्छा त्यांच्या चाहत्यांना खूप असते. अनेकदा हे कलाकार किती वयाचे आहेत, हे देखील कळत नाही. एखादा कमी वयाचा कलाकार हा अधिक वयाचा वाटतो, तर एखादा अधिक वयाचा कलाकार हा कमी वयाचा असतो. या कलाकारांचे वय किती आहे हे आम्ही आपल्याला आज आपण या लेखांमध्ये सांगणार आहोत.

1) मोहन जोशी – मोहन जोशी हे मराठीतील दिग्गज असे अभिनेते आहेत. मोहन जोशी यांनी अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे. मोहन जोशी सध्या “माझी तुझे रेशीमगाठी” या मालिकेत दिसत आहेत. त्यांचे वय 68 वर्षे आहे.

2) अर्चना पाटेकर – अर्चना पाटेकर यादेखील मराठीतील दिग्गज अभिनेत्री आहेत. यात सध्या “आई कुठे काय करते” या मालिकेमध्ये कांचन या भूमिकेत दिसत आहेत. त्यांचे वय 58 वर्षे आहे.

3) सुनील गोडसे – सुनील गोडसे हे देखील मराठीतील दिग्गज असे अभिनेते आहेत. सध्या ते “सुख म्हणजे नक्की काय असतं” या मलिकेमध्ये “दादा” या भूमिकेत दिसत आहेत. त्यांचे वय 55 वर्षे आहे.

4) रूपलक्ष्मी शिंदे – रूप लक्ष्मी शिंदे ही अभिनेत्री सध्या “मन उडू उडू झालं” या मालिकेमध्ये दिसत आहे. रूप लक्ष्मी यांचे वय 45 वर्ष आहे.

5) महेश मांजरेकर – महेश मांजरेकर हे मराठीतील दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक, अभिनेते आहेत. महेश मांजरेकर सध्या मराठी बिग बॉस 3 मध्ये दिसत आहेत. महेश मांजरेकर यांचे वय सध्या 63 वर्षे आहे.

6) शुभांगी गोखले – शुभांगी गोखले यांनी आजवर अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. शुभांगी गोखले सध्या “येऊ कशी तशी मी नांदायला” या मालिकेत दिसत आहेत. सध्या त्यांचे वय 53 वर्षे आहे.

7) सुनील बर्वे – सुनील बर्वे हे देखील दिग्गज असे मराठी अभिनेते आहेत. सुनील बर्वे यांनी अजून अनेक चित्रपटात काम केले आहे. सध्या ते “सहकुटुंब सहपरिवार” या मालिकेत दिसतात. त्यांचे वय 55 वर्षे आहे.

8) सविता मालपेकर – सविता मालपेकर यांनी देखील अनेक चित्रपटात काम केले आहे. काकस्पर्श या चित्रपटातील त्यांची भूमिका खूप गाजली होती. त्यांचे वय सध्या 63 वर्षे आहे.

9) किशोर महाबोले – किशोर महाबोले सध्या “आई कुठे काय करते’ या मालिकेमध्ये झळकत आहेत. त्यांचे वय 62 वर्षे आहे.

10) वर्षा उसगावकर – वर्षा उसगावकर या सध्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत दिसत आहेत. वर्षा उसगावकर यांचे वय 53 वर्षे आहे.

Team Beauty Of Maharashtra