गेल्या सहा वर्षापासून ही अभिनेत्री जगते केवळ एका किडनीवर, उपचारासाठी पैसेही नाहीत

बॉलीवूड हे असे क्षेत्र आहे की येथे तुमची चलती असेपर्यंत तुम्हाला विचारण्यात येते. हा अनुभव खुद्द अमिताभ बच्चन यांना देखील आलेला होता. अमिताभ बच्चन यांनी ए बी सी एल कंपनी ही काही वर्षांपूर्वी स्थापन केली होती. मात्र, ही कंपनी डबघाईला गेली. त्यानंतर अमिताभ बच्चन यांना कोणीही विचारत नव्हते. मात्र, त्यांचे मित्र व दिवंगत समाजवादी पक्षाचे नेते अमरसिंह यांनी त्यांना मदतीचा हात दिला. त्यानंतर अमिताभ बच्चन हे पुन्हा एकदा उभे राहिले.
मात्र, काही अभिनेता व अभिनेत्रीच्या बाबतीत तर अतिशय विचित्र अशा घटना घडत असतात. त्यांना आयुष्याच्या शेवटी उपचारासाठी पैसे देखील भेटत नाही. अशीही बॉलिवुडची काळी दुनिया आहे. आजवर अनेकदा आपण अशा बातम्या वाचल्या असतील, ऐकल्या असतील. आज आम्ही आपल्याला एका अशा अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत की, तिच्याकडे आता उपचारासाठी पैसे नाही आहेत. आणि तिची किडनी केवळ दोन टक्के काम करते.
गेल्या सहा वर्षापासून तिला हा त्रास सुरू आहे. काही वर्षापूर्वी मराठीतील दिग्गज अभिनेते यांनादेखील अशाच अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यावेळी मराठीतील काही कलाकारांनी त्यांना मदत देऊ केली होती. आणि त्यानंतर त्यांचे उपचार सुरू झाले होते. मध्यंतरी अभिनेता राहुल रॉय याला देखील अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यानंतर त्याला देखील तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले होते. नंतर त्याच्यावर अशी वेळ आली नाही. कारण की त्यांनी मिळवलेले यश आणि संपत्तीही टिकवून ठेवली.
मात्र, काही अभिनेते मिळालेले यश आणि संपत्ती टिकवून ठेवत नाहीत. मिळालेले पैसे दारू आणि पार्टी वर खर्च करतात. त्यामुळे त्यांना आयुष्यात शेवटी उपचारसाठी पैसे राहत नाहीत. मग बॉलिवूडमधील काही दरिया दील जे लोक असतात ते त्यांना मदत करतात.आज आम्ही आपल्याला अभिनेत्री अनन्या सोनी हिच्या बद्दल सांगणार आहोत. अनन्या सोनी हिने अनेक मालिका, चित्रपटात देखील काम केलेले आहे.
अनन्या सोनी ही टेक इट इझी, क्राइम पेट्रोल या मालिकेत काम केलेले आहे. तसेच तिने ‘है दिल अपना तो आवारा’ या चित्रपटात काम केले आहे. अनन्या सोनी हीची परिस्थिती सध्या खूपच बिकट झालेली आहे. गेल्या सहा वर्षापासून ती केवळ एका किडनीवर जगत आहे आणि त्यातच तिला आता कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ती रुग्णालयात उपचार घेत आहे. तिची किडनी आता केवळ 2 टक्केच काम करत आहे.
याबाबत तिने नुकताच व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंट वर टाकला आहे. या वीस मिनिटाच्या व्हिडिओमध्ये अनन्या हिने आपल्यावर गुदरलेल्या प्रसंगाची माहिती सगळ्यांना दिली आहे. तसेच आपल्याला आर्थिक अडचण आहे आणि सढळ हाताने आपल्याला मदत करावी असे आवाहनही तिने केले आहे. तिच्या या व्हिडिओला काही जणांनी प्रतिसाद दिलेला आहे. मात्र, काही जणांनी टेहाळणी केली आहे.